शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला

By भगवान वानखेडे | Updated: September 14, 2022 17:49 IST

Radheshyam Chandak : अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देदिल्ली आयबीकडून बुलढाण्यातील तीन जण अटकेत बुलढाणा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

- भगवान वानखेडे बुलढाणा : उद्योजक तथा श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करुन त्यांच्या कुटुंबियांकडून कोट्यवधी रुपये उकळून झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्याने जिल्ह्यातील बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा पोलिसांनी तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली. शहरातील शेर-ए-अली चौकातील मिर्झा आवेज बेग (२१), शेख साकीब शेख अन्वर(२०),उबेद खान शेर खान(२०) अशी प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही ७ सप्टेंबर रोजी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गन विकत घेतली. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तींचे अपहणर करुन कोट्यवधी रुपये कमवायचे असा प्लॅन त्यांचा होता. दरम्यान दिल्ली आयबी या तपास यंत्रणेने संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले. बुलढाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी दरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांचे भविष्यात अपहरण करण्याचा बेत होता असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

दिल्ली आयबीने बुलढाण्यातील तिघांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी भविष्यात श्रीमंत तथा उद्योजक,व्यापाऱ्यांचे अपहरण करु असे ठरविले होते. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती आणि बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांचेही भविष्यात अपहरण करु असे चौकशी दरम्यान सांगितले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.-प्रल्हाद काटकर, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन,बुलढाणा

माझा काेणीही शत्रु नाही, हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती मी पण पाेलीसांकडून घेत आहे त्यानंतर सविस्तर बाेलता येईल?- राध्येश्याम चांडक, संस्थापक बुलडाणा अर्बन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाChainsukh Sanchetiचैनसुख संचेतीPoliceपोलिस