शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या भांडणामुळे आपली बदनामी होते"; वाद मिटवणाऱ्या पुतण्याची काकाकडून निर्घृण हत्या, गाव हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:45 IST

बुलढाण्यात सख्ख्या काकानेच पुतण्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Buldhana Crime: सख्ख्या काका-काकूंमधील भांडण सोडवून त्यांना शांत राहण्याचा सल्ला देणे एका २४ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. किरकोळ वादाचा राग मनात धरून नराधम काकाने झोपेत असलेल्या पुतण्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील हातणी येथे बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली. गोपाल अजाबराव जाधव असे मृत पुतण्याचे नाव असून, पोलिसांनी आरोपी काका विनोद रामचंद्र जाधव ऊर्फ मंत्री याला अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद जाधव याचे बुधवारी सायंकाळी त्याच्या पत्नीसोबत जोरदार भांडण झाले होते. काका-काकूंमधील हे सततचे वाद पाहून पुतण्या गोपाल याने मध्यस्थी केली. "तुमच्या रोजच्या भांडणामुळे समाजात आपली बदनामी होते, तुम्हाला वादच करायचे असतील तर या घरात राहू नका," अशा शब्दांत गोपालने दोघांनाही खडसावले होते. आपल्याच पुतण्याने आपल्याला सुनावले, याचा तीव्र राग आरोपी विनोदच्या मनात सलत होता.

झोपेतच केला पुतण्याचा घात

रात्री ११ वाजेच्या सुमारास गोपाल घरामध्ये लोखंडी पलंगावर गाढ झोपलेला होता. याच संधीचा फायदा घेत खुनशी काका विनोद याने कुऱ्हाड हाती घेतली. त्याने झोपलेल्या गोपालच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि छातीवर कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने आणि पात्याने सपासप प्रहार केले. गोपालने जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण वार इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.

मक्याच्या शेतात लपला, पण पोलिसांनी पकडलं

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने गावात दाखल झाले. पोलीस येत असल्याचे समजताच आरोपी विनोद अंधाराचा फायदा घेत मक्याच्या शेतात जाऊन लपला. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोध मोहीम राबवून अवघ्या दोन तासांत मारेकऱ्याला शेतातून ओढून काढले.

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

चिखली पोलिसांनी आरोपी विनोद जाधवला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोटच्या मुलाप्रमाणे असलेल्या पुतण्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, घरगुती वादाचे रूपांतर अशा भीषण हत्याकांडात झाल्याने हातणी गावावर शोककळा पसरली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Argument ends in tragedy: Nephew murdered by uncle in Buldhana.

Web Summary : In Buldhana, an uncle brutally murdered his nephew for advising him to stop arguing with his wife. The accused was arrested. The village is in shock.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाPoliceपोलिस