शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीतील बिल्डरला ५६ लाखांचा घातला गंडा, पैशांच्या पावसाचे दाखवले प्रलोभन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 12:27 IST

ठाकुर्ली पूर्वेतील चोळेगाव परिसरात राहणारे सुरेंद्र पांडुरंग पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. कल्याण-शीळ मार्गालगतच्या त्यांचे दावडी गावातील पाटीदार भवननजीक श्री एकविरा स्वप्ननगरी बिल्डींग नं. ३ येथे कार्यालय आहे. 

डोंबिवली : ५० कोटी रुपयांचा पाऊस पडतो, असे प्रलोभन दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ५६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघा जणांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती असून पोलिसांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. लवकरच आरोपींना अटक करू, असा दावा त्यांनी केला आहे.ठाकुर्ली पूर्वेतील चोळेगाव परिसरात राहणारे सुरेंद्र पांडुरंग पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. कल्याण-शीळ मार्गालगतच्या त्यांचे दावडी गावातील पाटीदार भवननजीक श्री एकविरा स्वप्ननगरी बिल्डींग नं. ३ येथे कार्यालय आहे. गणेश, शर्मा गुरुजी, अशोक गायकवाड, महेश, रमेश मोकळे या पाच जणांनी सुरेंद्र यांना शनिवारी तुमच्या कार्यालयात ५० कोटींचा पाऊस पाडून देतो, असे प्रलोभन दाखविले. मात्र, त्यासाठी पूजा घालावी लागेल. परंतु, पूजा मोठी असल्याने त्यासाठी तुम्हाला ५६ लाख रुपये खर्च करावे लागतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.

गुन्हा केला दाखल-    पाच जणांनी पैसे आणण्यास सुरेंद्र यांना सांगितले. -    पैसा पाडण्याच्या निमित्ताने कार्यालयात सकाळी ८ वाजता पूजेचा घाटही घालण्यात आला. -    पूजा झाल्यावर इमारतीला प्रदक्षिणा मारून येतो, असा बहाणा करून पाचही जणांनी ५६ लाखांच्या रकमेसह पोबारा केला. -    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. -    याप्रकरणी फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस