शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कवलापूरमध्ये फरशी कामगाराचा निर्घृण खून; हल्लेखोर पसार

By शीतल पाटील | Updated: September 26, 2022 21:46 IST

खूनानंतर हल्लेखोर पसार झाले असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सांगली :  मिरज तालुक्यात कवलापूर येथे विमानतळाच्या खुल्या जागेत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास फरशी कामगाराचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय ४०, रा. बनशंकरी मंदिराशेजारी बुधगाव) असे मृताचे नाव आहे. खूनानंतर हल्लेखोर पसार झाले असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत विठ्ठल जाधव हा बुधगावमधील बनशंकरी मंदिराशेजारी आईसह राहतो. तो फरशी बसविण्याचे कामे करत होता. सोमवारी सकाळी तो कामासाठी घरातून बाहेर पडला होता. नियोजन विमानतळाच्या खुल्या जागेत एकजण रक्ताच्या थोराळ्यात पडल्याचे काही तरुणांना दिसले. त्यांनी तातडीने कवलापूरमधील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.

सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विठ्ठल याच्या डोके, कपाळ, तोंड व पायावर धारधार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणला. हा खून नेमका कोणी केला, त्या मागचे कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्षणिक वादातून खून झाल्याची चर्चा आहे. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. 

घटनास्थळी शहर विभागाचे उपअधीक्षक अजित टिके यांनी भेट दिली. ग्रामीणचे सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, सागर पाटील, अंमलदार रमेश कोळी, संदीप मोरे, कपिल साळुंखे, महेश जाधव तपास करत आहेत. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही संशयितांच्या मागावर आहे.

घटनास्थळी रक्ताने माखलेला तांब्याविमानतळाच्या खुल्या जागेत खूनाची घटना घडल्याची माहिती मिळताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी रक्ताने माखलेला तांब्या, बांधकामाचे टेप, चप्पल या वस्तू पोलिसांना मिळून आल्या. विठ्ठल हा अविवाहित होता. त्याच्या दोन्ही बहिणीचा विवाह झाला आहे. तो आईसह बनशंकरी मंदिराशेजारी रहात होता. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी