शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डबल मर्डर… भाजप नेत्यासह पत्नीची हत्या, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले मृतदेह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:17 IST

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरा शहरात भाजप नेते आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. महेंद्र प्रसाद सिंह व त्यांची पत्नी पुष्पा सिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

भोजपूर : बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एका दाम्पत्याच्या हत्येची घटना समोर आली आहे. येथील जिल्हा मुख्यालय असलेल्या आरा शहरातील नवादा पोलीस स्टेशन हद्दीतील कटिरा परिसरात अज्ञातांनी एका भाजप नेत्याची आणि त्यांच्या पत्नीची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली.  स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरा शहरात भाजप नेते आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. महेंद्र प्रसाद सिंह व त्यांची पत्नी पुष्पा सिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोरांनी हत्या केल्यानंतर पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले होते.

दरम्यान, ओळखीच्या व्यक्तीने या दोघांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भोजपूरचे एसपी प्रमोद कुमार, एएसपी हिमांशू, नवादा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेश रविदास, शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी संजीव कुमार आणि डीआयओ प्रभारी शंभू कुमार भगत यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी झाले असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 

भोजपूरचे एसपी प्रमोद कुमार यादव यांनी सांगितले की, पती-पत्नीचे मृतदेह वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते. घर पाहिल्यावर कोणीतरी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही, बहुधा ओळखीच्या कोणीतरी व्यक्तीने ही घटना घडवून आणली असावी. याचबरोबर, निवृत्त प्राध्यापक दाम्पत्याची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती भाडेकरूने फोन करून दिली. फॉरेन्सिक टीम रीतसर तपास करेल. प्रथमदर्शनी असे दिसते की, मृत्यू कशाचा तरी मार लागल्याने झाला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळेल, असेही एसपी प्रमोद कुमार यादव यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांच्याशी मैत्रीचे संबंधडॉ. महेंद्र प्रसाद सिंह हे भाजपचे नेते होते आणि त्यांचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. डॉ. महेंद्र प्रसाद सिंह हे 1982-83 च्या सुमारास बिहारमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. प्राध्यापक महेंद्र प्रसाद सिंह हे वीर कुंवर सिंह विद्यापीठात पीजी पॉलिटिकल सायन्स विभागाचे विभागप्रमुख आणि विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अध्यक्ष होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारBJPभाजपा