शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चेष्टामस्करी जीवावर बेतली! माहीममध्ये गुंडांची निर्घृण हत्या, हल्लेखोर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:34 IST

Murder : याबाबत त्याचा भाऊ मोहम्मद शाकिरने दिलेल्या फिर्यादीनुसार माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने शाहिदच्या डोक्यात दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले.

मुंबई -   मित्राबरोबर चेष्टामस्करीतून झालेल्या भांडणातून एकाची निर्घृण हत्या करण्याची घटना शनिवारी पहाटे माहीममधील वांजा वाडी येथे घडली. शाहिद उर्फ बरकत साबीर कुरेशी (वय २५, रा. बोहरी चाळ, माहीम) असे त्याचे नाव असून हल्लेखोराने डोक्यात दगड घालून व चाकूने वार करून पलायन केले. त्याचा रात्री उशीरापर्यत शोध लागलेला नव्हता.

शाहिदवर ही अनेक गुन्हे दाखल होते,असे पोलिसांनी सांगितले. शाहिद व हल्लेखोर दोघे मित्र असून एकाच परिसरात रहातात. शनिवारी पहाटे पर्यंत  वांजा वाडी येथील किंग रेफ्रिजरेशन, पटेल   बिल्डिंग येथे चेष्टा करीत बसले होते.   त्यातून  दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने   शाहिदच्या डोक्यात  दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतः वरील चाकूने त्याच्या पोटात  वार केले. याबाबत त्याचा भाऊ  मोहम्मद शाकिरने दिलेल्या फिर्यादीनुसार माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनMumbaiमुंबईPoliceपोलिस