शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची भावाकडून हत्या; पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 22:49 IST

विवाहित बहिणेची छेड काढणाऱ्या गुंडाची लहान भावानं चाकू भोसकून केली हत्या

नागपूर: विवाहितेच्या घरात शिरून तिची छेड काढणाऱ्या गुंडाचा विवाहितेच्या भावानं खून केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली. गुंडाची हत्या केल्यानंतर विवाहितेच्या भावानं पोलीस ठाणं गाठून आत्मसमर्पण केलं. विवाहितेची छेड काढणारा गुंड रोशन चौरसिया परिसरातच फिरत होता. त्यावेळी गुरू घासीदास गुरुद्वाराच्या परिसरात त्याचा विवाहितेचा भाऊ राजा भारतीसोबत वाद झाला. रोशननं राजावर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये हाणामारी सुरू असताना राजानं रोशनच्या हातातला चाकू हिसकावला आणि त्याच्यावर वार केले. यामध्ये रोशनचा मृत्यू झाला.बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची हत्या केल्यानंतर राजानं पळून न जाता थेट पोलीस ठाणं गाठलं. त्यानं कळमना पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी राजाला अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मिनीमाता नगर परिसरात घडलेल्या या घटनेची नागपुरात सध्या सर्वत्र चर्चा आहे.  

टॅग्स :MurderखूनMolestationविनयभंग