शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षाच्या मुलासोबत जबरदस्ती लैंगिक संबंध, ४० वर्षीय शिक्षकाला ५ वर्षांची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 15:28 IST

पीडित पक्षाचे वकील बेन लॉरेन्सने बोल्टन क्राउन कोर्टात सांगितले की, क्रेग स्लेटर इंग्लंडच्या एश्टन-इन-मेकरफील्डच्या बायरचेल हाय स्कूलमध्ये आयटीचा शिक्षक होता.

ब्रिटनमध्ये १५ वर्षाच्या शाळकरी मुलासोबत जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षकाला कोर्टाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गुन्हा सिद्ध झाल्यावर आणि कोर्टाने शिक्षा सुनावल्यावर शाळेच्या प्रशासनाने दोषी शिक्षकाला नोकरीहून काढलं आहे. पीडित मुलगा दुसऱ्या शाळेचा विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. दोघांची ओळख एका डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून झाली होती.

पीडित पक्षाचे वकील बेन लॉरेन्सने बोल्टन क्राउन कोर्टात सांगितले की, क्रेग स्लेटर इंग्लंडच्या एश्टन-इन-मेकरफील्डच्या बायरचेल हाय स्कूलमध्ये आयटीचा शिक्षक होता. त्याने पहिल्यांदा ग्रिंडर डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पीडित विद्यार्थ्याला संपर्क केला होता. त्याने कोर्टाला हेही सांगितले की, ४० वर्षीय क्रेग स्लेटरने जून आणि नोव्हेंबर २०१९ दरम्यान मुलाला भेटण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. (हे पण वाचा : लाजिरवाणी घटना! ७० वर्षीय महिलेवर बलात्कार; तब्येत बिघडल्याने दुष्कर्म आले उघडकीस )

सुनावणी दरम्यान कोर्टाने सांगितले की, आरोपी क्रेद स्लेटरच्या डिलीट करण्यात आलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचल्यानंतर हे स्पष्ट होतं की, आरोपीला पीडित मुलाच्या वयाबाबत माहीत होतं. कोणत्याही डेटींग अ‍ॅपवर रजिस्टर करण्यासाठी १८ वर्षापेक्षा अधिक वय असणं गरजेचं आहे. 

मात्र, पीडित मुलाने चुकीचं वय सांगून अ‍ॅपवर स्वत:चं नाव रजिस्टर केलं होतं. क्रेगने मुलासोबत चॅट करताना स्वत:चं नाव एंड्रूयू स्पिल्टर सांगितलं होतं. तो याच नावाने पीडित मुलासोबत चॅट करत होता. मुलाच्या वकिलाने सांगितले की, आरोपी शिक्षक मुलासोबत अ‍ॅडल्ट जोक आणि चॅट करत होता. त्याने मुलाला सांगितले की, तो त्याच्या पार्टनरला या नात्याबाबत काही सांगणार नाही. कारण आरोपी आधीच एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. (हे पण वाचा : एकाच वेळी ३५ गर्लफ्रेंड्ससोबत मजा करत होता रोमिओ; १ चूक अंगाशी आली अन् झाली पोलखोल)

हॉटेलमध्ये बोलवलं आणि...

आरोपीने मुलाला भेटण्यासाठी अनेकदा मनवल्याचं दिसतं. पण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला भेटता येत नव्हतं. एक दिवस चॅट करताना त्याला मुलाच्या १६व्या वाढदिवसाबाबत समजलं. ज्यानंतर त्याने महागडे गिफ्ट खरेदी केले आणि मुलाला ते घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलवलं. तो तिथे आल्यावर त्याने मुलासोबत जबरदस्ती केली.

आरोपीच्या तावडीतून सुटून मुलगा कसातरी पळाला. त्यानंतर त्याने सगळी घटना पोलिसांना सांगितली. ज्यानंतर क्रेग स्लेटरला अटक करण्यात आली. पोलिसांनीही पुरावा म्हणून त्याचा फोन ताब्यात घेतला होता. चौकशी दरम्यान क्रेगने स्वीकारलं की, तो १६ ते १९ वयोगटातील मुलांबाबत पझेसिव्ह राहत होता. त्याने दावा केला होता की, डेटींग अॅपवर प्रोफाइल असल्या कारणाने त्याला पीडित कमी वयाचा असल्याची माहिती नव्हती. 

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ