शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यात "डायमंड रिंग" दिली नाही नवरदेव रागवला; मंडपातच नवरीकडील मंडळींना बेदम चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:46 IST

Engagement broke clash over diamond ring : हॉटेलमध्ये वाद घातला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. 

ठळक मुद्देहा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता पोलीस याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

पंजाबमधील जालंधरमधील रामा मंडी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या साखरपुड्याच्या समारंभामध्ये डायमंडच्या अंगठीवरुन झालेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. डायमंडच्या अंगठीच्या मागणीवरुन हॉलवरच वर आणि वधू पक्षातील लोकांचा वाद सुरु झाला. 

हा वाद इतका विकोपाला गेला की वधुवर पक्षाच्या माणसं एकमेकांना मारहाण करु लागले. डायमंड अंगठी न दिल्याने साखरपुडा रद्द करण्यात आला. दुसरीकडे या हाणामारीमध्ये मुलाकडील लोकांनी नवरीचे केस ओढून तिला मारहाण केल्याचा आरोप वधू पक्षाने केला आहे. वर पक्षातील लोकांना मुलीकडच्यांकडून डायमंड अंगठी न मिळाल्याच्या रागातून वधू पक्षातील लोकांना मारहाण केली. हॉटेलमध्ये वाद घातला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. 

या हाणामारीच्या घटनेनंतर मुलीकडील मंडळीने पोलिसांमध्ये रितरस तक्रार नोंदवली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता पोलीस याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीकडील मंडळीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये साखरपुडा ठरवण्याआधी मुलाकडच्यांनी डायमंड अंगठीची मागणी केली नव्हती. मात्र रविवारी या साखपुड्याच्या समारंभादरम्यान जेव्हा वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालण्याची वेळ आली. त्यावेळी वरपक्षाने डायमंड अंगठी, सोन्याचं कडं आणि कानातील वळ्याची मागणी मुलीच्या घरच्यांकडे केली. त्यानंतर त्यांनी वर पक्षाची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वादाचे हाणामारीत रूपांतर झालं. नंतर प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी दोघांचं लग्न जमवणाऱ्याला बोलवण्यात आलं. तेव्हा मुलाचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलं असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्याने आपल्या आधीच्या पत्नीला सोडून दिलं असून आता तो दुसरं लग्न करु इच्छित असल्याचं समोर आलं. यावरुन मुलीकडील मंडळी चांगलेच संतापले. उलटपक्षी मुलाकडील मंडळींनी मुलीच्या नातेवाईकांना आणि मुलीला मारहाण करुन तिथून पळ काढला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही