शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधी नववधूने आपल्याच कुटुंबीयांना केलं बेशुद्ध अन् घरातल्या दागिन्यांसह ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 12:40 IST

Crime News : या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी लग्नाची मिरवणूक येण्याच्या काही तास अगोदर एका नववधूने आपल्याच कुटुंबीयांना चकमा देऊन पलायन केल्याची घटना घडली. वधूने आधी घरातील सदस्यांना नशेचा पदार्थ टाकलेला चहा देऊन बेशुद्ध केले, त्यानंतर घरातील मौल्यवान दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण फिरोजाबादच्या कौशल्या पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मुलीच्या मोठ्या बहिणीने सांगितले की, तिचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत पळून गेली आहे. मुलीने पळून जाण्यापूर्वी चहामध्ये काही नशेचे पदार्थ मिसळले होते. त्यामुळे नशेचा चहा प्यायल्याने कुटुंबातील 6 जण बेशुद्ध झाले, त्यांना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

संमतीशिवाय केले जात होते लग्न  शेजाऱ्यांनी सांगितले की, महिलेचे तिच्या संमतीशिवाय लग्न केले जात आहे. या लग्नासाठी ती खूश नव्हती. नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी रात्री घरात महिलांचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर सर्व शेजारी निघून गेल्यावर महिलेने घरातील सदस्यांना चहा दिला. चहा प्यायला लागताच सगळे बेहोश झाले. शुद्धीवर आल्यावर ते रुग्णालयात होते. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.

लहान बहिणीसोबत वराचे लग्नवृत्तानुसार, वधू घरातून पळून गेल्यानंतर आधी तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती न सापडल्यामुळे तिच्या लहान बहिणीसोबत वराचे लग्न लावण्यात आले. तसेच, या प्रकरणी तरुणीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न