शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

लग्नाच्या 23 दिवसांनी पत्नी निघाली 3 महिन्यांची प्रेग्नेंट, पुढे जे झालं ते वाचून डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 10:09 IST

Crime News : देश नगरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय निदाचा निकाह  याचवर्षी 23 जुलैला चंदोई गावातील सईद अहमदसोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी निदाच्या पोदात वेदना झाल्या.

Crime News : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) पीलीभीतमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीचं लग्न यावर्षी जुलैमध्ये झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनी नवरीच्या पोटात वेदना झाल्या. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा समजलं की, नवरी तीन महिन्यांची गर्भवती आहे. यानंतर तरूणीने हे स्वीकारलं की, तिच्या पोटातील बाळ हे तिच्या भाओजीचं आहे. मग भाओजी आणि मेहुणी सोबत राहू लागतात. पण नंतर एकेदिवशी तरूणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून येतो. कुटुंबियांनी तरूणीच्या भाओजीवर हत्येचा आरोप लावला आहे.

देश नगरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय निदाचा निकाह  याचवर्षी 23 जुलैला चंदोई गावातील सईद अहमदसोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनी निदाच्या पोदात वेदना झाल्या. कुटुंबिय तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. जिथे समजलं की, निदा महिन्यांची गर्भवती आहे. 

हे ऐकून सगळेच प्रश्नात पडले आणि दोन्ही परिवाराने पंचायत बोलवली. पंचायतमध्ये निदाने सर्वांसमोर हे मान्य केलं की, तिच्या पोटात बाळ आहे आणि ते तिचा भाओजी नसीरचं आहे. नसीरही पंचायतमध्ये बसला होता. तेव्हा नसीर म्हणाला की, तो निदासोबत लग्न करायला तयार आहे आणि तो तिला सोबत ठेवेल. निदाही आनंदाने भाओजीच्या घरी जाते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागते.

या घटनेच्या एक महिन्यांतर निदाचा मृतदेह गळफास घेतलेल्या संशयास्पद स्थितीत दिसून येतो. निदाच्या कुटुंबियांनी नसीरवर हत्येचा आरोप केला आहे. निदाचा भाऊ इरशाद म्हणाला की, लग्नाच्या काही दिवसांनीच आम्हाला समजलं की, निदाच्या पोटात आमच्या भाओजीचं बाळ आहे. यावरून निदाने पतीला घटस्फोट दिला आणि निदा आपल्या भाओजीसोबत राहू लागली होती.

याप्रकरणी सीओ सदर सुनील दत्त यांनी सांगितलं की, मृत महिलेचा पतीसोबत घटस्फोट झाला होता आणि ती तिच्या भाओजीसोबत राहू लागली होती. तिचा घटस्फोट तिच्या भाओजीसोबत अनैतिक संबंधामुळे झाला होता. आज तिने काही कारणाने आत्महत्या केली. महिलेच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे ज्याची आम्ही चौकशी करत आहोत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी