शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्यांना बेशुद्ध करून फरार झाली नवरी, पोलिसांनी पकडल्यावर समजलं ती तर आहे पाच मुलांची आई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:43 IST

crime News: उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली.

जयपूर - उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ती तिच्या दोन सहकाऱ्यांसाठी पकडली गेली. या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीमध्ये ही महिला पाच मुलांची आई असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र पीडित कुटुंबाने या संदर्भात कुठलीही तक्रार दिलेली नाही. मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार उदयपूरवाटीच्या भाटावाला येथे वास्तव्यास असलेल्या मुकेश सैनी याचे लग्न ठरत नव्हते. त्यामुळे त्याच्या मोठ्या भावाच्या नातेवाईकांनी त्याला बिहारमधून एक स्थळ आणले. त्यानंतर छपरा जिल्ह्यातील एका गावात ते पोहोचले तिथे अनिता नावाच्या तरुणीच्या नातेवाईकांकडून मुकेश कडून दोन वेळा प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्न करून अनिताची मुकेशसोबत पाठवणी केली.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा मुकेश आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य बेशुद्धावस्थेत घरात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घरच्यांना बेशुद्ध करून पसार झालेल्या नववधूचा पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा ही महिला पेट्रोलपंपजवळ सापडली. चौकशीमध्ये ही २५ वर्षीय महिला कधी तिचं नाव कविता, तर कधी अनिता असल्याचे सांगत होती. लग्न करण्यासाठी विकत घेऊन तिला दहा दिवसांपूर्वी इथे आणल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पती व्यसनी असल्याने तसेच मारहाण करत असल्याने घरातून पळ काढल्याचा दावा तिने केला. दरम्यान, पीडित कुटुंबाने याबाबत अद्याप तक्रार दिलेली नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न