शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीचे सत्र सुरूच; आणखीन एक अभियंता लाचप्रकरणी एसीबीच्या जाळयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 18:33 IST

Bribe Case : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

ठळक मुद्दे कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना कार्यालयातच 1 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आणखीन 1 लाख रूपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे भानुशाली यांनी संबंधित बाधिताला सांगितले. अखेर याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

कल्याण:  कल्याणचे तहसिलदार, केडीएमसीचा कनिष्ठ अभियंता असे अधिकारी एका पाठोपाठ लाचेच्या हव्यासापोटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकल्याच्या घटना नुकत्याच घडल्या असताना लाचखोरीचे सत्र अद्याप सुरूच असल्याचे सोमवारी झालेल्या आणखीन एका कारवाईतून समोर आले आहे. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना कार्यालयातच 1 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी भुसंपादनाचे काम सध्या कल्याण तालुक्यात सुरू आहे. या महामार्गात बाधित होणा-या जमिनींचे मुल्यमापन करून  अहवाल देण्याचे कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. दरम्यान अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता भानुशाली यांनी अहवाल देण्यासाठी तक्रारदार बांधकाम बाधिताकडून 9 सप्टेंबरला पडताळणी दरम्यान चार लाख रूपये लाचेच्या स्वरूपात स्विकारले. दरम्यान आणखीन 1 लाख रूपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे भानुशाली यांनी संबंधित बाधिताला सांगितले. अखेर याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कल्याण शासकीय विश्रमगृहाच्या आवारात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा लावला आणि 1 लाखांची रोकड स्विकारणा-या भानुशाली यांना रंगेहाथ अटक केली. महामार्गाच्या बांधणीत बाधित होणा-यांना योग्य तो मोबदला मिळत नाही असे आरोप, तक्रारी सर्रासपणो होत असताना दुसरीकडे मुल्यमापनाचा अहवाल देण्यासाठी बाधितांकडून लाचेची मागणी करण्याची अधिका-याची कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटक