शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराकडून घेतली ११ हजार रुपयांची लाच; कार्यकारी अभियंत्याला एसीबीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 21:14 IST

ACB arrested Executive engineer : तक्रारीवरून गुरुवारी सापळा रचण्यात आला. कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील कक्षात मानकर बसलेला असताना, त्याने तक्रारदार कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंता धर्मेंद्र मुगुटराव मानकर (५५) याला केबिनमध्ये ११ हजारांची लाच घेताना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

मोर्शी (अमरावती) : महावितरणचा मोर्शी येथील कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मुगुटराव मानकर (५५) याला केबिनमध्ये ११ हजारांची लाच घेताना गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली. वरूड येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय वीज कंत्राटदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार, एन.एस.सी. इन्फ्रा स्कीम अंतर्गतचे बारगाव, जरुड, पेठ मंगरुळी गावामध्ये केलेल्या कामाच्या देयकावर सही करून एक टक्का रक्कम सहा हजार व घोडदेव गावातील पोल्ट्री फार्मच्या कनेक्शनचे अंदाजपत्रक मंजूर करून दिल्याबद्दल पाच हजार असे एकूण ११ हजार रुपये लाचेची मागणी धर्मेंद मानकरने केली होती. यापूर्वीसुद्धा त्यांनी लाच मागितले असल्याचे समजते.तक्रारीवरून गुरुवारी सापळा रचण्यात आला. कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील कक्षात मानकर बसलेला असताना, त्याने तक्रारदार कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे, विनोद कुंजाम, युवराज राठोड, सुनील जायभाये, पंकज बोरसे,वाहन चालक सतीश किटुकले यांनी कक्षात धडक देऊन त्याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. मानकरविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (२६ जुलै २०१८ चे सुधारणा) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिस्तोवर सुरू करण्यात आली होती.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकPoliceपोलिसAmravatiअमरावतीBribe Caseलाच प्रकरण