शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेत भरायला लावली लाचेची रक्कम : लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 21:06 IST

राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़. 

ठळक मुद्देतक्रारदार हे करतात़ टेलरिंगचे काम , लाचखोरीचा असाही प्रकार

पुणे : निनावी तक्रार अर्जाचा तक्रारदाराच्या बाजूने रिपोर्ट पाठविण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम हवालदाराच्या बँक खात्यात भरायला लावून ती स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लोहमार्ग पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले़. राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़. ज्ञानदेव सोपान बारबोले (वय ५२, रा़ राखीव पोलीस उपनिरीक्षक, लोहमार्ग पोलीस मुख्यालय, खडकी) असे त्याचे नाव आहे़. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार हे टेलरिंगचे काम करतात़ .त्यांच्याविरुद्ध निनावी तक्रार अर्ज मिळाला होता़. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक बारबोले यांच्याकडे होती़. या अर्जाची चौकशी करु तक्रारदार यांच्या बाजूने सकारात्मक अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी बारबोले यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली़. या तक्रारीची पडताळणी केल्यावर बारबोले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले़. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व पोलीस उपनिरीक्षकाला पकडले़.असा रचला सापळातक्रारदार हे पोलीस उपनिरीक्षक बारबोले यांना १० हजार रुपये देण्यासाठी गेले असताना बारबोले यांनी ही रक्कम पोलीस हवालदार काझी यांच्या बँक खात्यात भरायला सांगितले़. तेव्हा त्यांनी बँक खात्यात का असे विचारल्यावर ते खडकी येथील बँकेच्या शाखेत तक्रारदार यांना घेऊन गेले़. त्यांनी पैसे भरायची स्लिप घेतली व कॅशियरकडे पैसे दिले़. कॅशियरने पैसे घेऊन स्लिपवर शिक्का मारुन त्या स्लिपची ग्राहकाकडील पावती बारबोले यांच्याकडे दिली़. त्यांनी ती स्वत: कडे घेतल्याबरोबर तेथे उपस्थित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बारबोले यांना रंगेहाथ पकडले़. आता या प्रकरणात हवालदार काझी यांना त्याची माहिती आहे का़, त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी बारबोले यांना तो बँक खाते क्रमांक त्यांनीच दिला का याची चौकशी करण्यात येऊन त्यात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी सांगितले़. शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजीPoliceपोलिसbankबँक