Breaking : खळबळजनक! महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मेसेज, दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By पूनम अपराज | Published: August 27, 2020 12:08 PM2020-08-27T12:08:24+5:302020-08-27T12:08:24+5:30

दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथक करत असल्याचे सांगितले.

Breaking : Message to Mahesh Manjrekar for ransom, case registered at Dadar police station | Breaking : खळबळजनक! महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मेसेज, दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Breaking : खळबळजनक! महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी मेसेज, दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमराठी सिनेसृष्टीत खळबळ, महेश मांजरेकर यांना खंडणी मागणारा धमकीचा मेसेजमहेश मांजरेकर यांना व्हॉट्सअॅपवरून गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती.

पूनम अपराज

मुंबई - अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध अशा महेश मांजरेकर यांना काल रात्री खंडणी मागणारा धमकीचा मेसेज मोबाईलवर आला आहे. याबाबत दादर पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला. महेश मांजरेकर यांना व्हॉट्सअॅपवरून गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या नावाने ही धमकी दिली जात होती.

 

दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, रात्री मांजरेकर यांना 35 कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला, त्यांनतर त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या पुढील तपास गुन्हे शाखेचे  खंडणी  विरोधी पथक तपास करत आहे. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

 

Web Title: Breaking : Message to Mahesh Manjrekar for ransom, case registered at Dadar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.