शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

Breaking : महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई पोलिसांना दिले 'हे' निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 14:25 IST

High Court gives relief to Mahesh Manjrekar : पोलिसांच्या तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं मांजरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

मुंबई - नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईच्या माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मात्र, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. मुंबईपोलिसांना पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं मांजरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर माहिम पोलीस स्थानकांत मांजरेकरांसह सिनेमाच्या निर्मात्यांवर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलीसांनी कारवाई केली आहे. दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून मांजरेकर यांच्यावर माहिम पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मांजरेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला होता. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये चित्रपटाचा भाग नाहीत व युट्यूबवरून ट्रेलरही हटवली आहेत,’ असे गुप्ते यांनी सांगितले होते.  

वृत्तसंस्था एएनआयनं यासंदर्भात ट्वीट करून ‘माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पॉस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत असं नमूद केलं आहे. 

टॅग्स :Mahesh Manjrekarमहेश मांजरेकर PoliceपोलिसMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालयSessions Courtसत्र न्यायालय