शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दृश्यम स्टाइल मर्डर! प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 13:24 IST

अजय देवगनच्या 'दृश्यम' सिनेमात असाच एक सीन होता. यात हिरो पोलीस स्टेशनमध्येच एका मृतदेह गाडतो.

मध्यप्रदेशच्या खरगोनमधून एक धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे. इथे एका संतोष नावाच्या प्रियकराने त्याच्या विवाहित प्रेयसी छाया बाईची हत्या करून तिला आपल्या नव्या घरात गाडलं आणि वरून सीमेंटने प्लास्टर केलं. अजय देवगनच्या 'दृश्यम' सिनेमात असाच एक सीन होता. यात हिरो पोलीस स्टेशनमध्येच एका मृतदेह गाडतो.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, छाया बाई ही काही दिवसांपासून वडिलांच्या घरी मोहनखेडी गावात रहायला आली होती. पण ३० डिसेंबरला अचानक ती वडिलांच्या घरून गायब झाली. ३ जानेवारीला परिवारातील लोकांनी भीकनगांव पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिली.

महिला गावातून गायब होण्यासोबतच तिचा प्रियकर संतोषही गावातून गायब झाला होता. गावातील लोकांनी आणि पोलिसांनी अंदाज लावला की, दोघे गाव सोडून पळाले असतील. सोबतच संतोषचे वडील किशोरही गावातून गायब होते. महिलेच्या परिवारातील लोकांनी शंका व्यक्ती केली की, संतोषणे तिला आपल्या नव्या घरात कैद करून ठेवले असेल. पोलिसांनी चौकशी केली पण काही पुरावा मिळाला नाही.

२६ जानेवारीला आजूबाजूच्या लोकांना संतोषच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घराचं लॉक तोडून चेक केलं. पण घर रिकामं होतं. खाली सीमेंटने प्लास्टर केलं होतं. ते खोदून काढलं तर महिलेच्या बांगड्या आणि कानातले दिसले. आणखी तीन फूट खोदलं तर छायाचा मृतदेह दिसला. त्यतूनच ही दुर्गंधी येत होती.

एसडीओपी प्रवीण कुमार म्हणाले की, एफएसएल टीम बोलवून महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. केस दाखल करून या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी आहे. संतोष आणि त्याचे वडील अजूनही फरार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशMurderखून