शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

गर्लफ्रेंडला भीक मागायला लावून करायचा मौजमजा, अखेर समोर आलं बॉयफ्रेंडचं धक्कादायक वास्तव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 14:59 IST

Crime News:

टोरँटो - एका गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. आपला बॉयफ्रेंड आपल्याला रस्त्यावर भीक मागायला भाग पाडायचा. तसेच पुरेशी कमाई न केल्यास आपल्याला बेदम मारहाण करायचा, असे या गर्लफ्रेंडने म्हटले आहे. तसेच या बॉयफ्रेंडने एकेदिवशी माझ्यावर पेचकसने अनेक वार करून मला जखमी केले, असेही या गर्लफ्रेंडने म्हटले आहे. दरम्यान, सध्या या तरुणीचा बॉयफ्रेंड तुरुंगात आहे. (Boyfriend forced girlfriend to beg on streets, finally the shocking reality of the boyfriend came to the fore)

याबाबतची सविस्तर माहिती अशी, मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार कॅनडाच्या पीटरबर्ग येथील २२ वर्षीय निकोल क्लार्ज हिने आपला २१ वर्षीय बॉयफ्रेंड काईल हेलमबाबत धक्कादायक दावा केला आहे. निकोलने सांगितले की, काईल हा सुरुवातीपासून फूट पाडणाऱ्या स्वभावाचा होता. त्याने मला माझे मित्र आणि कुटुंबीयांपासून वेगळे केले.

हे युगुल एकाच हॉस्टेलमध्ये राहायचे. तसेच काहीच आठवड्यात एकमेकांना डेट करू लागले होते. मात्र एकेदिवशी काईलने मद्यधुंद अवस्थेत निकोलच्या चेहऱ्यावर ठोसा लगावला. निकोलने विरोध केल्यावर त्याने तिची माफी मागितली आणि हा विषय टाळला. मात्र दिवसेंदिवस काईल त्याची गर्लफ्रेंड असलेल्या निकोलवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू लागला. तो तिला बंदी बनवून ठेवू लागला. तसेच तिच्यासोबत गुलामांसारखे वागू लागला.

त्याच्यापासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निकोलले रूम बदलला. मात्र काईल तिच्या मागे मागे तिथेही आला. तो निकोलचा मोबाईल रोज चेक करायचा. तो तिला कुणाबरोबर बोलू देत नसे, तसेच तिला नियमितपणे मारहाण करत असे. एवढेच नाही तर तो निकोलचे क्रेडिट कार्ड आपल्याजवळ ठेवत असे. हद्द तक तेव्हा झाली जेव्हा काईलने कुठल्यातरी भिकाऱ्याची भेट घेऊन येत निकोलवर भीक मागण्यासाठी दबाव आणू लागला. भीतीमुळे निकोल फुटपाथवर भीक मागू लागली मात्र एके दिवशी भीक कमी मिळाल्याने काईल संतापला. त्याने पेचकसने तिच्या गुडघ्यांवर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. भीक म्हणून मिळालेले सर्व पैसे तो स्वत:कडे ठेवत असे आणि दारूमध्ये उडवत असे.

एकेदिवशी भररस्त्यात निकोलला मारहाण होत असताना पाहून एक महिला तिला घरी घेऊन आली. तिने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी काईलला अटक केले. तसेच तिला कोर्टात हजर करण्यात आले. जिथे तिला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय