शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीवर चाकूहल्ला करत प्रियकराने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:36 IST

दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असल्याने प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला.

मुंबई : दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असल्याने प्रेयसीच्या आईने लग्नाला नकार दिला. नेहमीच्या नकारघंटेला कंटाळून प्रेयसीवर चाकूने जीवघेणा हल्ला करत प्रियकराने दहाव्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविल्याची घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली. यात मंगेश शांताराम राणे (२४) या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर तरुणीची प्रकृती चिंताजनक असून, कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.क्रांती (नावात बदल) ही अठरा वर्षांची तरुणी बारावीत शिकत आहे, तर आंबेडकरनगरमध्ये राहणारा मंगेश एका खासगी हाऊस किपिंग कंपनीत काम करत होता. दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असल्याने तिच्या आईचा लग्नाला विरोध होता. महिनाभरापूर्वी मंगेशने क्रांतीच्या आईकडे क्रांतीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र क्रांतीच्या आईकडून नकार मिळाल्याने आणि तो पुढे कायम असल्याने मंगेश कंटाळला होता, अशी प्राथमिक माहिती तपासातून समोर येत आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो क्रांतीला भेटण्यासाठी तिच्या त्रिवेणीनगरच्या जय आंबे सोसायटीतील इमारतीमध्ये दहाव्या मजल्यावरील तिच्या घरी गेला होता. तेव्हा तिची आई घरातच होती. पुन्हा लग्नावरून मंगेश आणि क्रांतीच्या आईमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान मंगेशने स्वयंपाक घरातील चाकू उचलून क्रांतीच्या पोटात तीनदा खुपसला व घराबाहेर जाऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने स्वत:च्याही हाताची नस कापली आणि दहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला.शेजाऱ्यांनी क्रांती आणि मंगेशला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र मंगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर क्रांतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती नाजूक आहे. या प्रकरणी कुरार पोलीस दोघांचे नातेवाईक तसेच शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या