शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला छेडणाऱ्या युवकाची दोन अल्पवयीन मुलांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 22:31 IST

Murder : लुंबिनीनगरातील घटना, दोन विधीसंघर्षित मुले ताब्यात

ठळक मुद्देही घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील कुंभारवाडा स्थित लुंबिनीनगरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. 

अमरावती : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून संतापलेल्या दोन  अल्पवयीन मुलांनी एका युवकाची चाकूने सपासप वार करून हत्या केली. ही घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील कुंभारवाडा स्थित लुंबिनीनगरात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. 

पोलीस सूत्रानुसार, रितेश ऊर्फ बंटी संतोष बारसे (२१, रा. पंचशीलनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. मृत युवक पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर चोरी, लुटमारीचे गुन्हे फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी १६ व १७ वर्षीय विधी संघर्षित बालकावर भादंविचे कलम ३०२, ३४, सहकलम ४,२५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. रितेश हा मजुरीचे काम करीत होता. त्याने यातील एका आरोपीच्या बहिणीची छेड काढली. त्यानंतर मित्राच्या सहकार्याने भावाने रितेशचा  काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी रितेश लुंबिनीनगरात एकटा उभा असताना दोन्ही आरोपींनी त्याच्यावर चाकुने हल्ला केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रक्तबंबाळ स्थितीतील रितेशला पोलीस व नागरिकांनी इर्विन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत  घोषित केले.  पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, एपीआय बिपीन इंगळे, डीबी स्कॉडचे एएसआय प्रकाश राठोड, सागर, भजगवरे, अनूप झगडे, दीपक सुंदरकर, सागर पंडित उपस्थित होते. 

पोहरा मार्गावरून घेतले ताब्यात  युवकाचा खून झाल्याची घटना वाॅकीटॉकीवरून पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांना मिळाली, तेव्हा ते गस्तीवर होते.  चांदूररेल्वे, पोहरा मार्गावरील एका हॉटेलजवळून ते येत असताना दुचाकीवरून आरोपी जाताना दिसले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पाठलाग करून वैष्णवदेवीच्या मंदिराजवळून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता युवकाची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन चाकू आढळून आले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसAmravatiअमरावती