शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

मुलगाच उठला बापाच्या जीवावर,शवविच्छेदनानंतर झाला हत्येचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 19:43 IST

आरोपीला सोमवारपर्यंत कोठडी

ठळक मुद्देमारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी शुक्रवारी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. मृताच्या भावाची तक्रार व चौकशीअंती कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला व आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अतुल घारपांडे करीत आहेत.  

अमरावती : बाप-लेकांनी सोबत मद्यपानानंतर जेवण केले. यानंतर पलंगावर कोण झोपणार, या वादातून  मुलाने वडिलांना जमिनीवर डोक्यावर आपटले तसेच छातीवर व तोंडावर लाथा घालून संपविल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कांडलकर प्लॉट येथे घडली. मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी शुक्रवारी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. 

पोलीस सूत्रांनुसार, रामदास सदाशिव पाचकवडे (रा. कांडलकर प्लॉट) असे मृताचे, तर भूषण रामदास पाचकवडे (३३) असे आरोपीचे नाव आहे. मृताचे रामदास यांचे बंधू सुनील पाचकवडे ( ५८, रा. वल्लभनगर) यांनी खोलापुरीगेट पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रथम याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात मृताच्या अंगावर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी भूषणला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. मृताच्या भावाची तक्रार व चौकशीअंती कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला व आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अतुल घारपांडे करीत आहेत.   पत्नी बाहेर गेल्यानंतर झाला घात रामदास पाचकवडे यांची पत्नी घटनेच्या वेळी बाहेर गेली होती. ती कामावरून परत आली तेव्हा पती जमिनीवर निपचित पडलेले आढळले. त्यांना डॉक्टरांकडे नेले असता, मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

 

विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी 

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

 

टॅग्स :MurderखूनAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक