शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गणपती दर्शनाला गुजरातला गेला अन् किडनॅप झाला; ५ दिवसांनंतर मुलाची थरारक सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 11:50 IST

मोबाइल सीडीआरच्या आधारे पोलिसांची टीम गुजरातला रवाना केली. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

पंकज पाटीलअंबरनाथ - गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले. तब्बल पाच दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता. अपहरण झालेल्या मुलाची सुटका आरोपींनी केल्यानंतर हा मुलगा घरी न येता गुजरात पोलिसांपासून वाचण्यासाठी पुन्हा बेपत्ता झाला. मात्र, बदलापूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

वांगणीतील महिलेचा अल्पवयीन मुलगा १ सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनसाठी गेला होता. त्यावेळी तिथे तीन जणांनी त्याचे अपहरण केले आणि फोनवरून त्याच्या आईकडे १२ लाखांची खंडणी मागितली. तिने त्वरित बदलापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोबाइल सीडीआरच्या आधारे पोलिसांची टीम गुजरातला रवाना केली. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतले. मात्र खरा थरार तिथूनच सुरू झाला. सुटका झाल्यानंतर मुलगा पुन्हा बेपत्ता झाला.

ग्रामस्थांनी घातला पोलिसांना घेरावगुजरात पोलिस अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत एका गावात गेले. मात्र त्या ठिकाणी आरोपींना ताब्यात घेताना संपूर्ण गावाने गुजरात पोलिसांना घेराव घातला होता.

मोबाइलच केला बंदआरोपींची चौकशी केली असता त्यांनी अपहरण झालेल्या मुलाची भीतीपोटी सुटका केल्याचे स्पष्ट झाले. मात्र सुटका झाल्यानंतर तो मुलगा पोलिसांच्या हाती लागला नाही. ज्या मोबाइल नंबरचा माग काढत बदलापूर पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले तो नंबर त्याने बंद केला आणि नवीन नंबर घेतला. मोबाइलच्या सिरीयल नंबरवरून त्या सिमकार्डचा शोध घेत पुन्हा या अपहरण झालेल्या मुलाचा जळगाव जिल्ह्यातून शोध घेतला. 

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीतीअपहरणकर्त्यांनी सुटका केल्यानंतर तू पोलिसांकडे का आला नाही याची विचारणा मुलाकडे केली असता गुजरात पोलिस आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवणार, अशी  भीती असल्यामुळे मी पोलिसांकडे गेलो नाही, असा खुलासा चाैकशीदरम्यान मुलाने केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे