ठाणे - रुस्तमजी टॉवरच्या ३२ व्या मजल्यावरून उडी मारून एका मुलाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव प्रथमेश परब (१८) असून ही घटना आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून प्रथमेशला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.परब हा कळवा, मनिषा नगर येथील देवेंद्र को. ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये वास्तव्याला होता. राबोडीतील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या रुस्तमजी टॉवरमध्ये तो नेमकी कोणाकडे आला होता. त्याने शेवटच्या 32 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय? याचा तपास राबोडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात ३२ व्या मजल्यावरून उडी मारून मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 19:15 IST
त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात ३२ व्या मजल्यावरून उडी मारून मुलाने केली आत्महत्या
ठळक मुद्दे त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव प्रथमेश परब (१८) असून ही घटना आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.