शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

भिंतीला छिद्र पाडून महागडे मोबाईल लांबवणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 7:45 PM

कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्दे या दोघांना कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पळून गेलेल्या चार आरोपींचा शोध घेत आहेत

कल्याण - पश्चिमेतील एसटी बस आगाराजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाच्या भिंतीला रात्रीच्या वेळी छिद्र पाडून वेगवेगळ्या कंपनीचे सुमारे २० लाख रुपयांचे मोबाईल चोरुन पोबारा करणा-या सराईत गुन्हेगार आलम मंटु शेख (४२, रा. झारखंड) आणि मंजूर मुनीफ शेख (३९, रा. बिहार) या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. या दोघांना कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरात असलेल्या एका मोबाईल दुकानावर दरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगुण यांच्यासह पोलीस हवालदार नरेश जोगमार्गे, विलास माळशेट्टे, दत्ताराम भोसले, ज्योतीराम साळुंखे, सुरेश निकुळे, अजित राजपूत, मंगेश शिर्के, निवृत्ती थेरे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा आणि राहुल ईशी यांनी सदर ठिकाणी सोमवारी मध्यरात्री सापळा लावला होता. यावेळी, चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना पकडण्याचा प्रयत्न पथकाने केला. मात्र, त्यातील चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. तर, पकडण्यात आलेल्या आलम मंटु शेख (४२, रा. झारखंड) याच्या अंगझडती एक राउंड लोड असलेला एक गावठी कट्टा तर मंजूर मुनीफ शेख (३९, रा. बिहार) याच्याकडे एक लोखंडी कटावणी आणि इतर दरोडा टाकण्याचे साहित्य पथकाला मिळून आले.आलम आणि मंजूर या दोघांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढिल तपास कल्याण गुन्हे शाखा करित आहे. गुन्हे शाखा कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन हे पळून गेलेल्या चार आरोपींचा शोध घेत आहेत

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMobileमोबाइलRobberyचोरीkalyanकल्याण