शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बॉलिवूडचा कास्टिंग डायरेक्टर चालवत होता सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 21:31 IST

ओशिवारा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मॉडेल पुरविणाऱ्या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे.

ठळक मुद्देअटक कास्टिंग डायरेक्टरचं नाव नवीनकुमार प्रेमलाल आर्या (३२) असं आहे.  या प्रकरणी अजय शर्मा आणि विजय हे दोघे फरार आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.   स्ट्रगलिंग नवोदित मॉडेल, अभिनेत्रींकडून नवीनकुमार वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला.

मुंबई - गेल्या आठवड्यात गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलाट सुरु असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आली. ही घटना ताजी असताना आता आणखी एक सेक्स रॅकेटचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ओशिवारा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मॉडेल पुरविणाऱ्या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. नवोदित मॉडेल पुरविण्याचे काम हा कास्टिंग डायरेक्टर करत होता. अटक कास्टिंग डायरेक्टरचं नाव नवीनकुमार प्रेमलाल आर्या (३२) असं आहे. 

याप्रकरणी समाजसेवा शाखेनं एका १८ वर्षीय मॉडेलची आणि २५ वर्षीय मेकअप आर्टिस्टची सुखरूप सुटका केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात या मॉडेलने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. नवीनकुमार हा ओशिवारा परिसरात सेक्स रॅकेट चालवतो, अशी माहिती समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे पथक नवीनकुमार याच्यावर नजर ठेवून होते.

जुहूतील हॉटेलमधील बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या स्ट्रगलिंग नवोदित मॉडेल, अभिनेत्रींकडून नवीनकुमार वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहक बनून पोलिसांनी नवीनकुमारकडे मॉडेलची मागणी केली. त्यानंतर सात बंगला येथील कॅफेमध्ये त्याने या ग्राहकाला भेटण्यास बोलाविले. यावेळी एक मॉडेल आणि एक मेकअप आर्टिस्ट तो सोबत घेऊन आला होता. त्याला एक मुलीच्या बदल्यात ६० हजार रुपये स्विकारताना कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी अजय शर्मा आणि विजय हे दोघे फरार आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.  

पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पदार्फाश, अभिनेत्रींना अटक

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटbollywoodबॉलिवूडPoliceपोलिसArrestअटक