शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Armaan Kohli Arrest: 'बिग बॉस' फेम अभिनेता अरमान कोहलीला अटक; ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी NCBची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:43 IST

मुंबई : अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला ...

मुंबई : अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी टीव्ही अभिनेता गौतम दीक्षितला अटक केल्यानंतर शनिवारी बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू होता.

एनसीबी मुंबईच्या पथकाने शनिवारी सकाळी एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून त्याचा बॉलीवूडमधील काही जणांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एक पथक पश्चिम उपनगरातील अरमान कोहलीच्या घरी पोहोचले. तेथे छापेमारी करून अनेक वस्तू जप्त केल्या व त्याला ताब्यात घेतले.

टीव्ही कलाकार गौरव दीक्षितला शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्याला सोमवारपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरावर छापा घालून एमडी, ड्रग्स, चरस जप्त केले होते. चित्रपट कलाकार एजाज खान याच्या चौकशीच्या आधारावर त्याला अटक केली असून त्याच्याकडील चौकशीतून अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.

बिग बॉस या लोकप्रिय शोमध्येही अरमान कोहली याने भाग घेतला होता. बेकायदा दारुसाठा केल्याप्रकरणी त्याला याआधी अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये अरमान कोहलीवर  त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा हिला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला  होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती. एका महिला फॅशन डिझाईनरशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणीही अरमानवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थbollywoodबॉलिवूड