शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्सचे बॉलिवूड कनेक्शन; गोव्यात एनसीबीने पकडला महत्त्वाचा सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 22:01 IST

कॅनडा आणि अमेरिकेतून दिल्ली, मुंबई गोवा आणि बंगळूरपर्यंत अंमली पदार्थ पोहचविण्याचे एक नियोजनबद्द रेकेटच एनसीबीने उघडकीस आणले आहे.

पणजी: अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत  अंमली पदार्थ व्यापाराचे अंतरराष्ट्रीय रेकेट  उघडकीस आले आहे. एनसीबीच्या मुंबईतील छाप्यातून मिळालेल्या माहितीवरून गोव्यातही कारवाई करून हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये काम करणाºया एफ अहमद नामक व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. हा अहमद बॉलिवूडमधील मोठ्या हस्तींना ड्रग्स पुरविण्याचे काम करीत असल्याचा एनसीबीला संशय आहे. 

कॅनडा आणि अमेरिकेतून दिल्ली, मुंबई गोवा आणि बंगळूरपर्यंत अंमली पदार्थ पोहचविण्याचे एक नियोजनबद्द रेकेटच एनसीबीने उघडकीस आणले आहे. या रेकेटच्या एका एफ अहमद नामक सूत्रधाराला गोव्यात कळंगूट येथे अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे अधिकारी के पी एस मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत फार मोठा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाला बड असे म्हणतात. उत्कृष्ट प्रतिच्या गांजापासून तो केला जातो आणि तो खूप महागडा असतो. दिल्लीत जप्त केलेला अंमली पदार्थ हा मुंबईत नेण्यासाठी आणला होता. तसेच मंबईत जप्त करण्यात आलेला अंमली २पदाथहा कॅनडाहून आणला होता आणि गोव्यात पाठविला जाणार होता. गोव्यातून तो बंगळूर व इतर ठिकाणच्या बॉलिवूड जगतातील काही हस्तींना पुरविण्यात येणार होता.

या कारवाईतील तपासादरम्यान या ड्रग रेकेटचा एक सूत्रधार गोव्यातही असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीकडून कळंगूटच्या एका मोठे नाव असलेल्या रेस्टॉरंटवर छापा टाकला. त्या ठिकाणी काम करणाºया अहमदला अटक करण्यात आली. एफ अहमद हा या रेस्टॉरंटमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत असला तरी त्याचा खरा धंदा वेगळाच आहे. अंमली पदार्थ बंगळूरच्या काही बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना पुरविण्याचे काम तो करीत असल्याची एनसीबीला माहिती मिळाली आहे.

बड्स म्हणजे काय?अत्यंत उत्कृष्ट प्रतीच्या गांजापासून  तो बनविण्यात येतो. सामान्य गांजाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने त्याची किंमत  अधिक असते. कोकेन या अंमली पदार्थाच्या बरोबरीने त्याची किंमत असते. एनसीबीने दिलेल्या महितीमुसार एका ग्रॅमसाठी ५ हजार रुपये एवढी किंमत असते. हा पदार्थ अमेरिका आणि कॅनडा या देशातून येतो.

टॅग्स :bollywoodबॉलिवूडDrugsअमली पदार्थ