शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलला काम देण्याचे आमिष दाखवून घेतले बोल्ड फोल्ड; शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या फोटोग्राफरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 19:34 IST

Crime News : याप्रकरणी मालाड पोलिसानी ओंकार उर्फ ​​ओमप्रकाश राजू तिवारी (२३) नामक फोटोग्राफरला अटक केली आहे. जो

मुंबई - एका मॉडेलला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून तिचे बोल्ड फोटो घेऊन शारीरिक सुखाची मागणी करण्यात आली. ती नाकारल्यावर ते फोटो व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी मालाड पोलिसानी ओंकार उर्फ ​​ओमप्रकाश राजू तिवारी (२३) नामक फोटोग्राफरला अटक केली आहे. जो स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर आणि एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसशी संलग्न फोटोग्राफर म्हणून देतो ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत.मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी हा इंटरनेटवरून टॉप मॉडेल्स आणि अभिनेत्यांचे फोटो चोरायचा आणि त्याने ये फोटो काढल्याचा दावा करत स्वतःच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड करायचा. अशाच प्रकारे अनेक इच्छुक मॉडेल्स त्याच्याशी संपर्क साधत असत. बंगालच्या २२ वर्षीय मॉडेलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईत आली होती आणि तिवारीच्या प्रोफाइलने प्रभावित झाली व त्याच्याशी ऑनलाइन संपर्क साधला. तेव्हा तिवारीने तिला प्रोडक्शन हाऊसमध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन देत तिचे काही बोल्ड फोटो पाठवायला सांगितले.

अंधश्रद्धेतून वडिलांनी घेतला चिमुकल्या मुलाचा जीव, कुऱ्हाडीने केले सात तुकडे

 

तिने फोटो  पाठवल्यावर, तो फोटो व्हायरल करेन असे सांगून तिच्याकडे तो लैंगिक सुखाची मागणी करू लागला. जेव्हा तिने त्याच्या मागणीला नकार दिला तेव्हा त्याने फोटो व्हायरल केले. ही बाब पीडितेला समजली आणि ८ जानेवारी रोजी तक्रार दाखल केल्यानंतर, वरिष्ठ निरीक्षक डी लिगाडे, एपीआय विवेक तांबे आणि त्यांचे सहकारी अशोक कोंडे आणि तौसीफ शेख यांच्या पथकाने रविवारी तिवारीचा टिटवाळा येथील स्वामी समर्थ नगरा येथील घरी शोध घेत त्याचा गाशा गुंडाळला. स्थानिक पातळीवर तो लग्न आणि कार्यक्रमाचे छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो लिगाडे म्हणाले की त्यांनी तिवारीवर भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकjobनोकरी