शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, चेहरा विद्रूप केल्याने ओळख पटविण्यास अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:47 IST

२० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह भरलेली सुटकेस सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळिंज पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

नालासोपारा  - २० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह भरलेली सुटकेस सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळिंज पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तुळिंज पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची अद्यापपर्यंत ओळख पटली नसून आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मधुकर आरुडे (४०) हे रविवारी रात्री श्रीरामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत गस्त घालत होते. त्या वेळी नालासोपारा स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर श्रीरामनगर येथील जय माँ शेरावाली पान भंडार दुकानाच्या समोर २० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह काळ्या रंगाच्या बॅगमध्ये भरलेला सापडला. त्यांनी याची माहिती तुळिंज पोलीस ठाण्याला देताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.या तरुणीची हत्या ही २४ ते ४८ तासांच्या दरम्यान झाली असून चेहरा पूर्णपणे विद्रूप  केल्याने ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचण निर्माण झाली आहे. या महिलेची हत्या कोणी व का केली? याचा शोध घेत तपास करीत असल्याचे तुळिंजचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तपासासाठी चार पथके  तरुणीच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या अधिकाऱ्यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात नंबरसह पोस्टर लावले आहेत. सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने शहरातील सुटकेस विकणाऱ्या दुकानात जाऊन माहिती गोळा केली जातआहे. या हत्येच्या तपासासाठी ३ ये ४ पथके पोलिसांनी तयार केली असून ओळख पटवून गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार