शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू, ठाण्यात येऊरच्या नील तलावात आणखी दोघे बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 17:29 IST

Drowning Case : एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे तेजस आणि ध्रुव या दोन मित्रांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

ठाणे: येऊरच्या पटोणापाडा येथील नील तलावात रविवारी वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोघे बुडाले असताना, त्या घटनांना २४ तास होत नाही तोच सोमवारी सकाळी आणखी दोघे जण त्याच नील तलावात बुडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातील एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.       

वर्तकनगर आणि समतानगर येथील तेजस प्रमोद चोरगे (१७) आणि  ध्रुव कुळे (१७) तसेच त्याचे हिमांशू वाघ, सोहम करंदीकर, दीप म्हात्रे,आर्यन कलगुटकर, अथर्व आवते असे सात जण येऊरच्या नील तलावात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहत असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेजस आणि ध्रुव या दोन मित्रांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती आणि अग्निशमन या विभागासह वन विभाग आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर अडीच वाजण्याच्या सुमारास तेजस याचा मृतदेह मिळाला. तो मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे, तसेच ध्रुव याच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरू आहे. अशी माहिती आपत्ती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेthaneठाणेPoliceपोलिसDeathमृत्यू