शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुन्हा सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, श्रद्धा वालकर प्रमाणेच हत्या झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 11:59 IST

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात बुधवारी सायंकाळी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात बुधवारी सायंकाळी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तपासासाठी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस पथकाने सुटकेस उघडली असता एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महिलेचे वय अंदाजे 28-30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

रिंगरोडजवळील एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. हा नाला नजफगढ नाल्याचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजूला एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी भीती व्यक्त केली आहे. हा खून 8 ते 10 दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे.

राजौरी गार्डनकडून पंजाबी बागच्या दिशेने जाणाऱ्या रिंग रोडजवळ एक सुटकेस पडल्याची माहिती एका वाटसरूने पीसीआरला दिली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंजाबी बाग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुटकेसमधून मृतदेह बाहेर काढला.

पुण्यात युवतीला धमकावून तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

मृतदेहाची स्थिती अत्यंत बिकट असून, त्यामुळे आठ ते दहा दिवसांपूर्वी खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. या महिलेची ओळख पटवून देण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली