शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला, डोर्लेवाडी गावात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:50 IST

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेशेजारील विहिरीमध्ये आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेशेजारील विहिरीमध्ये आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोमल हनुमंत जाधव असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.कोमल ही येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (दि. २१) नेहमीप्रमाणे कोमल शाळेत गेली होती. मात्र, शाळेचा पहिला तास झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्यादरम्यान भावाला भेटायला जायचे आहे, असे शाळेत सांगून बाहेर पडली. काही वेळाने शिक्षकांनी कोमल शाळेतून घरी आल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी कोमल घरी न आल्यामुळे पालकांनी व तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून न आल्याने तिच्या पालकांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र, शनिवारी (दि. २२) दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्या कुटुंबीयांनी कोमलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी हायस्कूलशेजारी असणाºया सरकारी विहिरीतच हरवलेल्या कोमलचा मृतदेह आढळून आला. कोमलची आत्महत्या की हत्या याबाबत गूढ आहे. याबाबत बारामती शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.तपास अधिकारी नीलेश अपसुंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की याप्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पोलिसांची चौकशी सुरू आहे, तर पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की मुलगी बेपत्ता झाल्यानंतर शुक्रवारी (दि. २१) कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. क ोमल हिच्या मृत्यूप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार एक जण तिला त्रास देत होता. त्याच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. क ोमल हिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर पोलीस तपासाला दिशा मिळेल.डोर्लेवाडी परिसरात यापूर्वीदेखील रोडरोमिओंनी त्रास दिल्याने युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच सावकारीच्यादेखील घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे डोर्लेवाडी परिसर पुन्हा चर्चेत आला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी