शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह, वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 07:02 IST

गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह गुरुवारी झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. ही घटना भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उंबरखांड पाच्छापूर जंगलात घडली.

भिवंडी  :  गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह गुरुवारी झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. ही घटना भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उंबरखांड पाच्छापूर जंगलात घडली. पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनीही विषप्राशन करून आत्महत्येचा  प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर मुंबईच्या  जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू  आहेेत.काही दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डीजवळच्या जंगलात अशाच प्रकारे तिघांचे मृतदेह आढळले होते. मात्र, तपासात या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले. श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. त्याची पत्नी रंजना (३०), मुलगी दर्शना  (१२), रोहिणी (६) आणि मुलगा  रोहित (९) या चौघांचे मृतदेह  झाडाला लटकलेल्या अवस्थेत  होते.उंबरखांड गावातील श्रीपत यांनी २१ ऑक्टोबरला पत्नी व तीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला एका झाडावरून दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने पाहिले असता, झाडाला सडलेल्या अवस्थेत चार मृतदेह दिसले. मृतदेहांच्या अंगावरील कपड्यांवरून त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यानंतर, पत्नी आणि तीन मुलांच्या मृत्यूची बातमी कळताच श्रीपतने स्वतःही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पडघा परिसरात  भीतीचे वातावरण            घटनेची माहिती मिळताच  ठाणे ग्रामीण विभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पडघा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी  दाखल होऊन पंचनामा केला. फॅारेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने  परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पडघा पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी