शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:04 IST

मुलीला काहीतरी संशय आल्याने तिने पोलिसांना माहिती दिली.

दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलगी जेव्हा तिच्या घरी जायची तेव्हा ती घरमालकाच्या मुलाला फ्लॅटच्या चाव्या देत असे. हे तिने अनेकदा केलं होतं. मात्र तीन महिन्यांपूर्वी घरमालकाच्या मुलाने याच गोष्टीचा फायदा घेत मुलीची खोली आणि बाथरूमच्या बल्ब होल्डरमध्ये दोन स्पाय कॅमेरे बसवले होते. मुलीला संशय आल्याने तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपी घरमालकाच्या मुलाला अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी जेव्हा तिचे WhatsApp चेक करत होती तेव्हा तिला सर्वात आधी संशय आला. तिच्या WhatsApp वर अशी काही ॲक्टिव्हिटी होत होती. ज्यामुळे तिला संशय आला. असे अनेक मेसेज होते जे तिने वाचले नव्हते, पण जेव्हा तिने तिचं WhatsApp चेक केलं तेव्हा मेसेजवर ब्लू टिक्स दिसत होत्या.

डीसीपी अपूर्वा यांनी सांगितलं की, विद्यार्थिनीला WhatsApp वर काही संशयास्पद हालचालीही दिसल्या. त्यानंतर तिने तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीशी याबाबत चर्चा केली. तेव्हा WhatsApp अकाऊंट हे दुसऱ्या लॅपटॉपवरही लॉग इन केल्याचं उघड झालं. पोलीस तपासात असं समोर आलं की, मुलीचा करणवर पूर्ण विश्वास होता आणि तो तिच्या फ्लॅटवर जायचा. त्यामुळे त्याने हे केल्याचा संशय होता. 

दिल्ली पोलिसांनी करणची चौकशी केली आणि तपास केला तेव्हा त्यांना करणकडे एक स्पाय कॅमेरा तसेच दोन लॅपटॉप सापडले ज्यामध्ये तो रेकॉर्ड केलेले व्हिडीओ साठवत असे. करणने मुलीच्या घरात जो स्पाय कॅमेरा लावला होता तो रिमोटला किंवा ऑनलाइन कनेक्ट केलेला नव्हता, त्यामुळे करण कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मुलीकडून फ्लॅटची चावी घेण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तो चिपमधील डेटा ट्रान्सफर करू शकेल.

दिल्ली पोलिसांना करणविरुद्ध ठोस पुरावे सापडले, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण हा दिव्यांग आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थिनी आणि दिल्लीत भाड्याने फ्लॅटमध्ये एकट्या राहणाऱ्या महिलांना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि अनोळखी व्यक्तींवर किंवा कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये असंही सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप