शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खूनसत्र थांबेना; पुन्हा एका युवकाला भोसकले, आठवड्यात अर्धा डझन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 11:58 IST

मागील आठवडाभरापासून खूनाचे सत्र सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे.

नाशिक: शहरामध्ये मागील आठवडाभरापासून खूनाचे सत्र सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे. या आठवड्यात खुनाची सहावी घटना शनिवारी मध्यरात्री घडली. खून झाला की पोलिसांकडून संशयितांना अटक केली जाते; पोलिसांचा वाचक राहिला नसल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी (दि.28)  मध्यरात्री प्रेम संबंधावरून झालेल्या वादात उडी घेतल्यामुळे वडाळा रोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत जखमीचा मृत्यू झाला. सागर प्रकाश रावतर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून हे तिघेही सख्ख्ये-चुलत भावंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. भरत भोये, गौतम भोये, गणेश भोये असे हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. मुंबई नाका पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

मागील आठवड्यात एका दारुड्या पतीने पत्नीच्या डोक्यात फावडा हाणून ठार मारले होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बापाने मुलाला उशीने गळा तोंड दाबून ठार केले आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंचवटी भागात उघडकीस आली. त्याच दिवशी म्हसरूळला वादाची कुरापत काढून युवकाला टोळक्याने भोसकले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुणे महामार्गावर पौर्णिमा बस थांब्यावर पुण्याच्या पाहुण्याला दुकजकीस्वार हल्लेखोरांनी शस्त्राने वार करून भल्या पहाटे ठार मारले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर जवळ गोदावरी नदीपात्रात युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. या युवकाला ठार मारून नदीत फेकून दिले होते. त्यांनतर पुन्हा  शिवाजीवाडी येथे युवकाला भोसकल्याची घटना शनिवारी घडली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक