शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आपसातल्या वादात वसईच्या उमेळमान गावात रक्तपात; तरुणाच्या अंगावर मित्रानेच केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:11 IST

धारधार शस्त्राने गळयावर व पोटावर सपासप वार करीत त्यास रक्ताच्या थारोळ्यात सोडले

आशिष राणे, लोकमत न्यूज नेटवर्क

वसई:वसई विरार शहरात सध्या गोळीबाराच्या घटना ताज्या असताना आता माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेळमान गावात दोघा मित्रांमध्ये रक्तपाताची घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडल्याची माहिती माणिकपूर पोलिसांकडून मिळाली आहे. या घटनेत आरोपी राम यादव याने रागाच्या भरात सुरज जयस्वाल याच्यावर धारधार शस्त्राने गळयावर व पोटावर सपासप वार करीत त्यास रक्ताच्या थारोळ्यात सोडून गेला.

दरम्यान या थरारक घटनेत पीडित सुरज जयस्वाल हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला नजीकच्या गोल्डन पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्याची प्रकृती चिंताजनक असून लागलीच त्याच्यावर शस्त्रक्रिया हि केली जाणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,सुरज व राम हे दोघेही मित्र असून त्याच्यात पूर्वी हि पैशाच्या देवाणघेवाणी मधून वाद सुरु होताच  तर याआधीही हा वाद माणिकपूर पोलिसा समोर गेला होता मात्र मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोघा मित्रा मध्ये पुन्हा एकदा वाद झाला असता या वादात राम ने सुरजच्या वडिलांना दूरध्वनी वरून आप के लडके का मै गला काटुंगा अशी धमकी दिली होती.

त्यामुळे वेळीच खबरदारी म्हणून हे सुरज चे कुटूंब पुन्हा माणिकपूर पोलिसात गेलं असता त्याच संधीचा फायदा घेत आरोपी राम ने सुरज याच्यावर सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केलं. धक्कादायक म्हणजे राम यादव ने वार केल्यावर बराच वेळ सुरज एकाकी खितपत पडला होता मात्र त्याची स्थानिक गावकऱ्यांनी अजिबात विचारपूस ही केली नाही अखेरीस त्याच्या काही  मित्रांनी त्याची मदत करत तात्काळ त्याला गोल्डन पार्क रुग्णालयात दाखल केले.

विशेष म्हणजे आरोपीने गुन्हा केल्यावर थेट माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची शरणागती पत्करली असून घडला प्रकार पोलिसांना कथनही केला आहे. तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरु होती तर वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी मात्र वसई विरार शहरवासीय हादरून गेले आहेत.   

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस