शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कर्नलच्या घरात रक्ताचा खेळ; आईनेच रचला मुलाच्या हत्येचा कट, धक्कादायक कारण समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:39 IST

'अर्जुन मर्डर केस'चा पोलिसांनी उलगडा केला असून, या हत्येमागे अर्जुनची आई बीना शर्मा हिचाच हात असल्याचे समोर आले आहे.

ज्या आईने जन्म दिला, तिनेच आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्यूचा कट रचल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये घडली आहे. 'अर्जुन मर्डर केस'चा पोलिसांनी उलगडा केला असून, या हत्येमागे अर्जुनची आई बीना शर्मा हिचाच हात असल्याचे समोर आले आहे. गॅस एजन्सी, बँकांचे कोटींचे कर्ज आणि वडिलोपार्जित संपत्तीचा वाद यातून एका मातेने सुपारी देऊन आपल्या मुलाचा काटा काढला.

१२ लाखांत ठरला सौदा; २५ दिवसांपासून रचले जात होते जाळे

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जुनची हत्या करण्याची योजना गेल्या २५ दिवसांपासून आखली जात होती. आई बीना शर्मा, तिचा जवळचा साथीदार विनोद उनियाल आणि प्रॉपर्टी डीलर अजय खन्ना यांनी मिळून अर्जुनला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी पंकज राणा नावाच्या सुपारी किलरला १२ लाख रुपये दिले. पंकजने त्याचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला भाऊ राजीव यालाही या कामात सामील करून घेतले. या दोघांनी अनेक दिवस अर्जुनची रेकी केली आणि संधी मिळताच तिबेटी मार्केटजवळ त्याची गोळ्या झाडून हत्या केली.

आई आणि मुलाच्या नात्यात मिठाचा खडा का पडला?

अर्जुन आणि त्याची आई बीना यांच्यातील वाद आजचा नव्हता. शहीद कर्नल रमेश चंद शर्मा यांच्या निधनानंतर कुटुंबाला गॅस एजन्सी मिळाली होती. सुमारे १५ वर्षांपूर्वी जेव्हा अर्जुनने या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली, तेव्हापासून माय-लेकात खटके उडू लागले. बीना शर्मा या कुटुंबाबाहेरील व्यक्तींना व्यवसायातील पैसे देत होत्या, ज्याला अर्जुनचा तीव्र विरोध होता.

८ कोटींचे कर्ज आणि १४ कोटींचा सौदा

या हत्येमागे मुख्यत्वे दोन आर्थिक कारणे होती, ती म्हणजे कुटुंबाने गॅस एजन्सीसाठी बँकेकडून घेतलेले ८ कोटींचे कर्ज आणि जीएमएस रोडवरील वडिलोपार्जित मालमत्तेचा सौदा. आई बीना यांनी ही मालमत्ता डॉ. अजय खन्ना यांना १४ कोटी रुपयांना विकली होती. यातील ४ कोटी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरले गेले, तर उरलेले ८ कोटी बीना यांनी आपल्या खात्यात जमा होताच दुसऱ्याच दिवशी विनोद उनियालला ट्रान्सफर केले.

मुलाने कोर्टातून आणला होता 'स्टे'

आपल्या हक्काच्या संपत्तीची अशा प्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याचे पाहून अर्जुन संतापला होता. त्याने या मालमत्तेच्या व्यवहारावर न्यायालयातून स्थगिती आणली होती. यामुळे व्यवहार अडकला आणि डॉ. खन्ना यांच्यावर पैसे परत करण्याचा दबाव वाढला. हाच दबाव आणि संपत्तीचा लोभ यातून आईने मुलालाच कायमचे संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने केवळ डेहराडूनच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. ज्या बापाने देशासाठी बलिदान दिले, त्यांच्याच घरात संपत्तीसाठी रक्ताचे नाते रक्ताचे तहानलेले झाले, हे पाहून हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother orchestrates son's murder for property, debt in Dehradun.

Web Summary : In Dehradun, a mother orchestrated her son's murder over property disputes and debt. She hired contract killers for ₹12 lakhs. The son's opposition to her financial dealings and a property deal gone sour triggered the crime, shocking the nation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंड