शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

सख्ख्या बहिणीवरच केला होता अत्याचार, ‘पीडिते’ला मिळाली गर्भपाताची परवानगी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 14:51 IST

Sexual Abuse : उच्च न्यायालयाने दिले शल्य चिकित्सकांना निर्देश

वर्धा : सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर तिच्याच भावाने अत्याचार करून २४ आठवड्याची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा शहरात उघडकीस आला होता. पीडिता १५ वर्षांची असल्याने गर्भपात करण्यासाठी पीडितेच्या आईने उच्च न्यायालयात परवानगी मिळावी म्हणून धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने पीडितेचा गर्भपात तातडीने करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना आदेशित केले.

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच अल्पवयीन सख्ख्या भावाने वारंवार शोषण केले होते. पीडितेचे पोट दुखत असल्याने तिची आई रुग्णालयात घेऊन गेली असता ती २४ आठवड्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली होती. मात्र, १५ वर्षांची मुलगी बलात्कारातून आई होणे ही बाब मुलीच्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने घातक होती. तिच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेत गर्भपात करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने तत्काळ दखल घेत २९ जुलै रोजी प्रकरण सुनावणीला ठेवले. याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांना पीडितेला शासकीय रुग्णालयात दाखल करून एक समिती स्थापन करून तपासणी करा, तसेच तिचा गर्भपात करणे शक्य आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल २ ऑगस्ट रोजीपर्यंत देण्याबाबत आदेशित केले होते.

अखेर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अनंत साळवे यांनी युक्तिवाद केला. 

डॉक्टरांनी गर्भपातास दर्शविली होती असमर्थतामेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी ॲक्ट १९७१ च्या तरतुदीनुसार २० आठवड्यांपर्यंतचा गर्भ कायदेशिररीत्या पाडता येतो. मात्र, पीडिता ही २५ आठवड्यांची गर्भवती असल्यामुळे सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी मुलीचा गर्भपात करण्यास असमर्थता दर्शविली होती.

सहा सदस्यीय समितीच्या अहवालावरून निर्णय

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी सहा सदस्यीय समितीद्वारे पीडितेची तपासणी करून मुलीचा गर्भपात करणे शक्य असल्याचे सांगितले तसेच गर्भ पुढे वाढू देणे हे मुलीच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला घातक असल्याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. २ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने अहवालाचे अवलोकन करून शासनाची बाजू ऐकून घेत जिल्हा शल्य चिकित्सकांना गर्भपात करण्याचे आदेशित केले. तसेच गर्भपातावेळी गर्भाचे डीएनए सॅम्पल जतन करण्याबाबत शल्यचिकित्सकांना निर्देशित केले.

पुर्नवसनाच्या दृष्टीने आर्थिक मदत कराउच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण मनोधैर्य योजनेत पात्र ठरत असून, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाला पीडित मुलीला तिच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने तातडीने योग्य ती आर्थिक मदत करण्याचेही आदेशित केले. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळpregnant womanगर्भवती महिलाHigh Courtउच्च न्यायालय