शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चक्क अंध व्यक्तीनेच चोरल्या मोटारसायकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:29 IST

नुकत्याच येऊन गेलेल्या अंधाधुन चित्रपटासारखीच ही घटना आहे. चित्रपटात सहानुभूती मिळवण्यासाठी नायक अंध असल्याचे दाखवतो. येथे खटले रद्द करण्यासाठी अंध असल्याचे प्रमाणपत्र दाखवीत आहे.

- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : गुजरात पोलिसांनी अहमद शेख नावाच्या व्यक्तीला ५ मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. आश्चर्य म्हणजे अहमद शेख हा शंभर टक्के अंध असल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या अंधाधुन चित्रपटासारखीच ही घटना आहे. चित्रपटात सहानुभूती मिळवण्यासाठी नायक अंध असल्याचे दाखवतो. येथे खटले रद्द करण्यासाठी अंध असल्याचे प्रमाणपत्र दाखवीत आहे.डिसेंबर २०१९ मध्ये रानोल, इसानपूर व नरोडा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरल्याबद्दल रखियाल (गुजरात) येथील अहेमद शेख याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरुद्ध या पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ आणि वाटवा पोलीस ठाण्यात २, असे एकूण ५ गुन्हे नोंदवण्यात आले.या सर्व गुन्ह्यातील सहआरोपींनी दिलेल्या माहितीवरून अहेमद शेख याला आरोपी करून एकापाठोपाठ एक गुन्ह्यात अटक करण्यात आली. एका गुन्ह्यात त्याला न्यायालयात कोठडीसाठी पोलिसांनी हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांनी तो पूर्णपणे अंध असल्याचा दावा केला. २००९ मध्ये अंध व्यक्ती संघटनेने आणि २०१७ मध्ये सरकारी दवाखान्याने दिलेलेअहेमद शेख १०० टक्के अंध असल्याचे प्रमाणपत्र सादर केले.पूर्णपणे अंध असणारी व्यक्ती मोटारसायकल चोरी करू शकत नाही, असे न्यायालयाला सांगितले. पोलिसांनी मात्र या बचावाचा जोरदार विरोध केला. बापूनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अहेमद शेख मोटारसायकल चालवताना एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने अहेमद शेख याला जामीन नाकारला व न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.१00 टक्के अंध असल्याचा दावाजिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने शेख याने गुजरात उच्च न्यायालयात त्याच्या विरुद्धचे सर्व एफआयआर रद्द व्हावेत म्हणून याचिका दाखल केली आहे.याचिकेत तो १०० टक्के अंध असून, त्याला दैनंदिन कामे करण्यासही मदत घ्यावी लागते, असा दावा केला आहे.उच्च न्यायालयाचे न्या. एस.एच. व्होरा यांनी या याचिकेवर पोलिसांचे म्हणणे मागविले आहे.यापूर्वी २०१७ मध्येही २ मोटारसायकली चोरीच्या गुन्ह्यात शेख याला अटक करण्यात आली होती. यापैकी एका गुन्ह्यात तो अंध असल्याच्या मुद्यावर त्याची सुटका झाली.या गुन्ह्यात फिर्यादीची मोटारसायकल मिळाल्याने त्यानेही अंग काढून घेतले. दुसरा गुन्हा न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी