शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथे ब्लॅकमेल करत शाळकरी मुलीवर बलात्कार, दोन जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 21:21 IST

शालेय मुलीचे अत्याचाराचे अश्लील चित्रण करून ते व्हायरल केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोस्को व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गंभीर गुन्हा

राजगुरुनगर : कडूस (ता. खेड) येथील पंधरा वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून त्याचे अश्लील चित्रण  व्हायरल करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार घडत असून पोलिसांनीबलात्कार, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अ‍ॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल केला आहे. सचिन रघुनाथ टोके (वय २०) आणि त्याचा साथीदार मयुर दगडु टोके (वय २३, दोघेही रा. कडूस) यांना खेडपोलिसांनी अटक केली आहे. खेड उपविभागीय पोलीस कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मावस बहिणीसोबत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणीला आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत सेल्फी फोटो काढला. हा फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात एकांतात नेऊन बलात्कार केला. यावेळी झाडाच्या आड लपून बसलेल्या मित्राने चित्रीकरण केले. त्यानंतर पुन्हा दोन आठवड्यांनी असेच आणखी फोटो डिलीट करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकांतात बोलवले. पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या सर्व प्रकाराचे तेथे लपून बसलेल्या मयूर टोके याने मोबाईलमध्ये चित्रीकरण  केले. यानंतर हा व्हिडिओ तिला दाखवत ब्लॅकमेल करण्यात आले. व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती घालत पुन्हा एकदा पीडितेवर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर वर्गामधील एका मुलीने आरोपीबरोबरचा अश्लिल व्हिडीओ पाहिल्याचे मुलीला सांगितले. या घटनेबाबतची कुजबूज होऊ लागली. ही चर्चा पिडीत मुलीच्या कानावर आल्यानंतर तिने हा प्रकार घरी सांगितला. अल्पवयीन मुलीच्या आईने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.संशयित आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी दिली आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करीत आहेत.

टॅग्स :KhedखेडPuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिस