काळवीट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 09:19 PM2019-09-26T21:19:49+5:302019-09-26T21:21:24+5:30

उद्या सलमान जर जोधपूर कोर्टात राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Blackbuck poaching case: Increase in actor Salman Khan's problem | काळवीट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ 

काळवीट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ 

googlenewsNext
ठळक मुद्देकोर्टात सलमान हजर न राहिल्यास कोर्ट सलमानचा जामीन रद्द करू शकतात आणि त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.  1998 च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दोषी ठरवले होते.

मुंबई - काळवीट शिकार प्रकरणी अभिनेतासलमान खानला जोधपूर कोर्टात उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या सलमान जर जोधपूर कोर्टात राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोर्टात सलमान हजर न राहिल्यास कोर्ट सलमानचा जामीन रद्द करू शकतात आणि त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

1998 च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानलाजोधपूर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दोषी ठरवले होते. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने हा निकाल 5 एप्रिल 2018 ला दिला होता. ही शिक्षा माफ व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांकडून जोधपूर कोर्टात निवेदन करण्यात आले असून सध्या ही केस कोर्टात सुरू आहे. पण सलमानची या खटल्यातून अद्याप तरी सुटका झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस सलमानच्या अडचणीत वाढ होत आहे.

सलमान कोर्टात हजर राहात नसल्याने न्यायाधीशांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायधीशांनी या तारखेला सलमानच्या वकिलांना सांगितले होते की, सलमानने पुढील तारखेला कोर्टात हजर राहावे अन्यथा त्याचा जामीन फेटाळला जाईल. गेल्या तारखेला देखील सलमानने कोर्टात हजेरी लावली नव्हती, त्यावेळी सलमानला कोर्टात हजर राहाण्याविषयी सलमानच्या वकिलांना सांगण्यात आले होते. पण तरीही सलमान या तारखेला देखील उपस्थित राहिला नसल्याने न्यायधीशांनी त्याच्या वकिलांना सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे उद्याच्या सुनावणीला सलमान कोर्टात हजर राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 
हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान आणि या चित्रपटातील त्याच्या काही सहकलाकारांनी काळवीटाची शिकार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.

सलमानला जीवे मारण्याची धमकी 
काळवीट शिकार प्रकरणी सुनावणीसाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी (दि.२७) जोधपूरच्या कोर्टात हजर होणार आहे. तत्पूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून चौकशीही सुरु केली आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त डी. सिंह यांनी अशा प्रकारे धमकी देणाऱ्यांमागे कोण आहे हे शोधण्याचे काम आम्ही करीत आहोत. जर ते कोण आहेत हे समजले तर आम्ही योग्य ती कारवाई करु. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल अशी माहिती दिली. 

Web Title: Blackbuck poaching case: Increase in actor Salman Khan's problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.