मीरारोड - लॉकडाऊन आणि परीक्षा नसल्याने कामगारांसह लोक कुटुंबियांना घेऊन आपापल्या गावी निघाल्याने रेल्वेतिकिटांचा काळाबाजार सुद्धा फोफावला आहे. रेल्वेपोलिसांच्या विशेष पथकाने भाईंदर पश्चिम येथे साईबाबा मेडिकल व अनिल ट्रॅव्हल्स येथे धाड टाकून काही लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. साईबाबा मेडिकल व अनिल ट्रॅव्हल्स कंपनी येथून आयआरसीटीसीची अनेक खाती उघडण्यात आली. अनेक ओळखपत्रे व ऑनलाईन बुकिंगच्या सॉफ्टवेअरचा गैरवापर करून तिकिटांची बुकिंग जास्त पैसे आकारून लोकांना करून दिली जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकास मिळाली.त्या आधारे पथकाने गणेश देवल नगरमधील साईबाबा मेडिकलवर धाड टाकली. तेथून सुशील सिंह याला अटक करण्यात आली . त्याच्या कडे १ लाख ११ हजार १७५ रुपयांची १५१ तिकिटे सापडली . तर अनिल ट्रॅव्हल्समधून आरोपी रवी शुक्ला ह्याला अटक करून १७ हजार ९४५ रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
लोकं गावी निघाल्याने औषध विक्रीच्या नावाखाली रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 20:35 IST
Crime News : पोलिसांच्या विशेष पथकाने भाईंदर पश्चिम येथे साईबाबा मेडिकल व अनिल ट्रॅव्हल्स येथे धाड टाकून काही लाखांची तिकिटे जप्त केली आहेत.
लोकं गावी निघाल्याने औषध विक्रीच्या नावाखाली रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
ठळक मुद्दे साईबाबा मेडिकल व अनिल ट्रॅव्हल्स कंपनी येथून आयआरसीटीसीची अनेक खाती उघडण्यात आली.