शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Rashmi Thackeray: रश्मी ठाकरेंबद्दल ट्विटप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 09:28 IST

BJP Criticize Rashmi Thackeray: पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरुवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले आहे. यादरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

गजारिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. याच प्रकरणात गुरुवारी गजारिया यांना ताब्यात घेत, त्यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. यावेळी त्यांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले. तसेच, मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले आहे.

जितेन हे एक राजकारणातील हस्तक वा प्यादे असून त्याने त्याच्या राजा व वजिराच्या भूमिकेनुसार हे ट्वीट केले असावे. कारण भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व पदाधिकाऱ्यांनी ट्वीटचे समर्थन केले आहे. भाजपमध्ये अनेकप्रकारे शिक्षण, प्रशिक्षण केले जाते. केंद्रातील अपयशावरून लक्ष उडवायला अशा खेळ्या करणे हे त्यांचे राजकारणच आहे. ज्यांना सायबर क्राईममधील सुरक्षिततेसाठी करायचे असेल, त्यांनी केंद्राच्या ६६ अ कायद्याला परिणामकारक करावे. शक्ती कायद्याच्या धर्तीवर केंद्राने सायबर क्राईमचा समावेश करावा.               - नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

रश्मी ठाकरे यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणे, अपमान करणे अशी ट्रोलरची पार्टी तयार झाली आहे. भाजप आता भारतीय ट्रोल पार्टी झाली आहे. अशा विकृत लोकांवर कठोर कारवाई करायला हवी. महिलांविषयी गरळ ओकणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर कायमची बंदी घातली पाहिजे.    - मनीषा कायंदे, शिवसेना आमदार

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना