शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नगरसेविकेच्या दिराने केली परिचारिकेला शिवीगाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:36 IST

माफीनंतर परिचारिकांचे काम बंद आंदोलन मागे 

ठळक मुद्देकाही काळ परिचारिका आणि लोखंडे यांच्यात वाद झाला वॉर्ड क्रमांक ११ मध्ये परिचारिकांनी त्यांची ओळख विचारली. भायखळा येथील भाजपाच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे दीर देवीदास लोखंडे यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेला दमदाटी केली.

मुंबई - नायर रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेला अपशब्द वापरले आणि नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी रुग्णालयातील परिचारिकांनी सकाळी काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला. भायखळा येथील भाजपाच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे दीर देवीदास लोखंडे यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेला दमदाटी केली.नायर रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे दीर नातेवाइकांच्या भेटीस आले होते. वॉर्ड क्रमांक ११ मध्ये परिचारिकांनी त्यांची ओळख विचारली. मात्र यामुळे संतप्त झालेल्या देवीदास लोखंडे यांनी परिचारिकेला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली.काही काळ परिचारिका आणि लोखंडे यांच्यात वाद झाला, त्या वेळेस लोखंडे यांनी परिचारिकेला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली. या घटनेचा निषेध म्हणून परिचारिकांनी माफीची मागणी करीत सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत कामबंद आंदोलन केले. त्यानंतर दुपारी सुरेखा लोखंडे यांनी रुग्णालयात दाखल होत परिचारिकांची माफी मागितली. या माफीनाम्यानंतर परिचारिकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. 

३५ परिचारिकांनी नोंदवला सहभाग 

याविषयी, कामगार संघटना नेत्या त्रिशीला कांबळे यांनी सांगितले की, रात्रपाळीत एकच परिचारिका काम करते. एका वॉर्डमध्ये किमान तीन परिचारिका असणे गरजेचे आहे, मात्र अजूनही पालिका रुग्णालयात परिचारिकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, बऱ्याचदा हा लोकप्रतिनिधींचा त्रास परिचारिकांना सहन करावा लागतो, त्यामुळे रुग्णालयातील ३५० परिचारिकांनी या काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलBJPभाजपा