शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाढदिवसाची पार्टी करणं 'या' भाजपा नगरसेवकाला पडलं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 15:21 IST

खारघरमध्ये शुक्रवारी एका ३३ वर्षीय तरुण रिक्षाचालकाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देनगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसनिमित्ताने जमलेल्या 11 लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० – क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

पनवेल - संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असताना मित्रमंडळींसह पार्टी करणे भाजप नगरसेवकाला महागात पडले आहे. पनवेलमधील नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसनिमित्ताने जमलेल्या 11 लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मित्रांना घरी बोलावून वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पनवेल पालिकेच्या नगरसेवक व इतर ११ जणांवर पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तातडीने नगरसेवक बहिरा व अन्य जणांविरोधात संसर्ग साथ नियंत्रणात निष्काळजी वर्तन केले म्हणून आणि संचारबंदीत चारपेक्षा अधिक जण जमवले म्हणून गुन्हे नोंदविले आहेत.

काही दिवसांपूर्वी नगरसेवक बहिरा यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी परिसरात भाजपतर्फे मास्क वाटप केले होते. तसेच, खारघरमध्ये शुक्रवारी एका ३३ वर्षीय तरुण रिक्षाचालकाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरलेली असताना नगरसेवकाने वाढदिवस साजरा केला. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० – क मधून निवडून आलेले अजय तुकाराम बहिरा यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला एका जागरुक नागरिकाने याबाबत माहिती दिल्यावर शुक्रवारी रात्री 12 वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्यासह पोलिसांचे पथक नगरसेवक बहिरा यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसpanvelपनवेलBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या