शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बांभोरी पुलाजवळ दुचाकीस्वाराला चिरडले ! समोरा-समोर दुचाकींची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 22:44 IST

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरील महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रस्त्यावर फेकल्या गेलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. दिपक सुरेश नन्नवरे (२०, रा. बांभोरी ता. धरणगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, या अपघात दोन जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

दिपक नन्नवरे हा आईवडील आणि भावांसोबत बांभोरी येथे वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. मंगळवारी सांयकाळी जळगावातील खासगी काम आटोपून दीपक हा मित्र ललित गोकूळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत जळगावाकडून बांभोरी येथे दुचाकीने येत होता. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दिपक हा महामार्गाच्या मध्यभागी पडला. त्याचवेळी बांभोरीगावाकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला ललित पाटील हा गंभीर जखमी झाला.

अपघात घडल्यानंतर बांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्र परिवारांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. तर धडक देणा-या दुचाकीवरील देखील एक जण जखमी झाला आहे. मयताच्या पश्चात आई-वडील आणि भाउ असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात