शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बिहार हादरलं! निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

By पूनम अपराज | Updated: October 1, 2020 21:53 IST

BJP leader shot dead : बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, अशी माहिती बेउर पोलिस स्टेशनचे प्रभारी फुलदेव चौधरी यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बिहार हादरलं आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील तेजप्रताप नगरात आज सकाळी ही घटना घडली. भारतीय जनता पक्षाचे जयंत मंडलचे उपाध्यक्ष राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा हे मॉर्निंग वॉकला गेले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राजेश कुमार झा यांचा जागेवरच मृत्यू झाला. बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.ही घटना जवळपास बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. स्थानिक वृत्तानुसार, तेज प्रताप नगर परिसरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ गोळ्या घालून झा यांना ठार मारण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हॉलच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे पोलीस तपास करीत आहेत.पोलिसांनी संशयावरून काही लोकांना ताब्यात घेतले आहे आणि असे म्हटले आहे की, या हत्येमध्ये भाजप नेत्याचा जवळचा कोणीतरी सामील होता. राज्याच्या राजधानीत भाजपा नेत्याची हत्या झाली असून राज्य विधानसभा निवडणूकीच्या एक महिन्यापूर्वीच ही खळबळजनक घटना घडल्याने तेथील राजकारण तापले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, अशी माहिती बेउर पोलिस स्टेशनचे प्रभारी फुलदेव चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याच्या हत्येने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

टॅग्स :FiringगोळीबारBJPभाजपाPoliceपोलिसBiharबिहारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Deathमृत्यूMurderखून