शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Bihar News: बिहारच्या जेलमधील मद्यपीही दंड भरून सुटका करून घेऊ शकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 07:43 IST

bihar News: संपूर्ण दारूबंदी लागू असलेल्या बिहार राज्याच्या जेलमध्ये बंद असलेल्या मद्यपींनाही नवीन तरतुदीचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत दारू पिण्याच्या आरोपाखाली प्रथमच जेलमध्ये गेलेले आणि ३० दिवसांची शिक्षा पूर्ण केलेले आरोपी जेलमधून सुटू शकणार आहेत.

- एस. पी. सिन्हा पाटणा : संपूर्ण दारूबंदी लागू असलेल्या बिहार राज्याच्या जेलमध्ये बंद असलेल्या मद्यपींनाही नवीन तरतुदीचा लाभ दिला जाणार आहे. या अंतर्गत दारू पिण्याच्या आरोपाखाली प्रथमच जेलमध्ये गेलेले आणि ३० दिवसांची शिक्षा पूर्ण केलेले आरोपी जेलमधून सुटू शकणार आहेत. ज्यांना ३० दिवस पूर्ण झालेले नाहीत, ते २ ते ५ हजार रुपयांचा दंड भरून जेलबाहेर येऊ शकणार आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यावरील खटलाही बंद करण्याची तरतूद आहे. जेलमधून सुटण्यासाठी आरोपीला कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर शपथपत्र सादर करावे लागेल. पोलिसांशी सहकार्य न केल्यास किंवा दंड न भरल्यास त्याला ३० दिवस जेलमध्ये रहावे लागेल. कोणी दुसऱ्यांदा दारू पिताना पकडला गेला तर त्याला एक वर्षाची शिक्षा अनिवार्य आहे. दारूची सवय असणारांची ओळख छायाचित्र, आधार कार्ड व ब्रेथ अनलायझरच्या डिजिटल रेकॉर्डने पटविली जाणार आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे राज्यातील न्यायालयांवरील खटल्यांचा भार कमी होईल व जेलमधील गर्दीही कमी होणार आहे. दारूबंदी कायद्याच्या उल्लंघनात यापूर्वी एखाद्या वाहनाची किंवा परिसराची सीलबंदी झालेली असेल तर नव्या तरतुदीनुसार, ते सोडविण्याची संधी मिळणार आहे. तसेच खटला बंद करण्यात येणार आहे. 

त्यांचा खटला बंद केला जाईल दारूबंदी खात्याचे अपर मुख्य सचिव के. के. पाठक यांनी सांगितले की, दारू पिण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये बंद असलेले आरोपीही नव्या नियमावलीनुसार दंड भरून सुटू शकणार आहेत. त्यांचा खटला बंद केला जाईल. नव्या नियानुसार, दारूसह पकडलेल्या वाहनांच्याना विमा कंपनीने निर्धारित केलेल्या वाहन मूल्याच्या ५० टक्के रक्कम दंड भरून वाहन सोडले जाईल. वाहनाचा दावेदार नसल्यास वाहन जप्तीनंतर १५ दिवस वाट पाहून लिलाव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार