शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'तो' वाद गेला विकोपाला! जमिनीसाठी एकाच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 11:54 IST

Crime News : एकाच कुटुंबीतील तब्बल 6 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर यामध्ये तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना बिहारमध्ये घडली आहे. नालंदा जिल्ह्यामध्ये सामूहिक हत्याकांड समोर आलं आहे. जमिनीवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आहे. एकाच कुटुंबीतील तब्बल 6 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर यामध्ये तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून ही मन सुन्न करणारी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

लोदीपूर गावात झालेल्या या गोळीबारात 9 जणांना गोळी लागली होती. ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील यदू यादव, पिंटू यादव, महेश यादव, धीरेंद्र यादव, शिवेंद्र यादव आणि विंदा यादव यांचा समावेश आहे. तर मिट्टू यादव, परशुराम यादव आणि मंटू यादव हे तीन जण यामध्ये जखमी झाले आहेत. जमिनीवरून वाद सुरू असून ते प्रकरण न्यायालयात आहे. मात्र तरीदेखील आरोपी महेंद्र यादव आणि राजेश्वर यादव हे आपल्या मुलांसह तिथे जबरदस्तीने शेती करत होते. यावरून वाद झाला आणि पुढे तो वाद विकोपाला गेला आहे. 

पीडित कुटुंबीयांनी गोळीबाराची सुचना पोलिसांना दिली. मात्र पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले नाहीत. मात्र आता सामूहिक हत्याकांडानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे. या धक्कादायक घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 55 किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलात एका 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. 

माणुसकीला काळीमा! 12 वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

झाडावर लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलगी सकाळी घरामध्येच होती. त्यानंतर तिने वडिलांना आपण आईसोबत जंगलात जात असल्याचं सांगितलं. यानंतर ती घरातून निघून गेली. वडिलांना वाटलं मुलगी आईसोबत आहे. तिच्यासोबत ती जंगलात गेली आहे. मात्र आईला याबाबत काहीच कल्पना नव्हती. मुलीची आई जंगलातून परतली तेव्हा वडिलांनी तिच्याकडे मुलीची चौकशी केली. तेव्हा मुलगी आपल्यासोबत आलीच नसल्याचं आईने सांगितलं. यानंतर घाबरलेल्या पालकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली पण ती मुलगी कुठेच सापडली नाही. गावकऱ्यांदेखील मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा मुलीचा मृतदेह हा जंगलामध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

टॅग्स :FiringगोळीबारBiharबिहारIndiaभारतPoliceपोलिस